adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्थानिक गुन्हे शाखेची पहाटेची थरारक कारवाई..!देशी दारूची तस्करी उघड;2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त

 स्थानिक गुन्हे शाखेची पहाटेची थरारक कारवाई..!देशी दारूची तस्करी उघड;2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...

 स्थानिक गुन्हे शाखेची पहाटेची थरारक कारवाई..!देशी दारूची तस्करी उघड;2 लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-संगमनेर येथे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाकडून दारूसह एकूण 2,19,520/- रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी हस्तगत केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे  अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामधील अवैध धंद्यांची माहिती काढून कठोर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत.त्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि महादेव गुट्टे,पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले,बाळासाहेब गुंजाळ,अरुण मोरे यांचे पथक तयार करून संगमनेर शहरातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले होते.दिनांक 09/01/2026 रोजी पहाटेच्या सुमारास, सदर पथक संगमनेर शहर परिसरात माहिती काढत असताना संगमनेर येथून देवगड कडे एका चारचाकी वाहनातून देशी दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.त्यानुसार पथकाने प्रवरा नदीच्या पात्रावरील पुलाजवळ सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली.

या कारवाईत इसम नामे गणेश बारुक धामणे (वय 40 वर्षे),रा. इंदिरानगर,गल्ली नं. 01, संगमनेर,ता. संगमनेर यास त्याच्याकडील हुंदाई कंपनीची ऍक्सेंट कार क्रमांक एम.एच. 12 सी. डी. 5701 सह ताब्यात घेण्यात आले.वाहनाची तपासणी केली असता कारच्या डिकीत देशी दारूचे बॉक्स आढळून आले.ताब्यातील इसमाकडे अधिक विचारपूस केली असता सदरची देशी दारू ही इसम नामे उमेश सूर्यवंशी (पूर्ण नाव माहित नाही), रा. अकोले नाका, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर याच्याकडून आणलेली असल्याची माहिती दिली.या कारवाईत आरोपीकडून 19,520/- रुपये किमतीची देशी दारू तसेच 2,00,000/- रुपये किमतीची हुंदाई कंपनीची ऍक्सेंट कार असा एकूण 2,19,520/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणी पोकॉ/176 बाळासाहेब अशोक गुंजाळ, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 36/2025 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

No comments