धुळ्यात भोरखेडा येथे महाराणा प्रतापसिंहजी यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहांत संपन्न ! अनेक मान्यवरांची उ...
धुळ्यात भोरखेडा येथे महाराणा प्रतापसिंहजी यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहांत संपन्न ! अनेक मान्यवरांची उपस्थिती
![]() |
| भोरखेडा येथे महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करताना मान्यवरांसह आदींची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. |
(धुळे जिल्हा) सौ. शुभांगी सरोदे- पुरीगोसावी प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भोरखेडा (ता. शिरपूर जि. धुळे):- येथील महाराणा प्रताप स्मारक अभियान समिती अंतर्गत भोरखेडा येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी आयोजित करण्यात आलेला भूमिपूजन सोहळा मंगळवार दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अनेक मान्यवरांच्या उपस्थित उत्साहांत संपन्न झाला. हा ऐतिहासिक सोहळा महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चंद्रवीरसिंहजी नमाणा, उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या शुभहस्ते पार पडला. या प्रसंगी व्यासपीठावर महाराणा प्रताप प्रतिष्ठानचे मा. मंगलसिंग पंडितसिंग राजपूत, भोरखेड्याच्या सरपंच श्रीमती. विठाबाई ठाकरे, पोलिस टुडे (नाशिक) चे संपादक मा.रत्नदीपसिंग सिसोदिया, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. सचिन राजपूत (सावळदे), महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता मा. जयपालसिंग वासुदेव गिरासे (पिंपरी), उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा. रवींद्रसिंग गिरासे (सोमुभैय्या) आराळे, धुळे जिल्हा अध्यक्ष मा.योगेश राजपूत (भटाणे), जिल्हा महामंत्री मा.रणवीर राजपूत (सावळदे), जिल्हा उपाध्यक्ष मा. संदीप राजपूत (नाणे), नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष मा.प्रदिप राजपूत (अमळथे), वाठोडा सरपंच मा. नारायण चौधरी,मा. नेतेंद्रसिंग राजपूत, अहिल्यापूर माजी सरपंच संग्रामसिंह राजपूत, बोरगांव माजी सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, मा. अभिराजसिंग, मा. मोहितसिंग, पत्रकार मा. महेंद्रसिंग राजपूत, मा. वीरूपाल राजपूत (शिरपूर) मा.प्रदीप राजपूत (भावेर), भोरखेडा येथील मा. शिवाजी जमादार, मा. बब्रुवान जमादार, मा. भोपू राजपूत, मा. आधार राजपूत, मा.दरबार राजपूत, मा.प्रेमसिंग राजपूत, मा.राजेंद्र जमादार, मा. गणवीरसिंग राजपूत,मा. योगेशभाऊ जाधव (सावेर) मा. विजुभाऊ राजपूत (सावेर) मा. राजेंद्र प्रताप राजपूत, मा. राजेंद्र रामसिंग राजपूत, मा.संग्रामसिंग जमादार, मा.सुनील जाधव मा.प्रवीण राजपूत,मा.प्रवीण एकनाथ राजपूत, मा.सुरेंद्र राजपूत मा. अनिल विजयसिंग राजपूत यांच्यासह महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजस्थान स्थित महाराणा प्रताप स्मारक अभियान समिती यांच्या वतीने संपूर्ण देशभरांत राष्ट्रपुरुषांचे मोफत पाचशे पुतळे, शंभर स्मारक तसेच १२ ज्योतिर्लिंगावर वास्तुसंग्रहालय बगीचे स्मारक तयार करण्यात येणार आहेत. तसेच महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ कुंभलगड (राजस्थान) येथे १५१ फूट उंच भव्य महाराणा प्रतापसिंहजी यांची मूर्ती उभारण्यात येणार असून महाराणा प्रताप यांची समाधीस्थळ चावंड, उदयपूर (राजस्थान) येथे भव्य स्मारक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पराक्रम, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेच्या आदर्शांची जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून महाराणा प्रतापसिंहजी यांच्या कार्याचा गौरव केला.
या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्यामुळे भोरखेडा परिसरात अभिमान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पिंपरी येथील पोलीस पाटील मा.जयपालसिंग गिरासे यांनी केले, प्रास्ताविक मा. रत्नदीपसिंग सिसोदिया यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन आयोजक मा. मंगलसिंग पंडितसिंग राजपूत यांनी मानले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महाराणा प्रताप प्रतिष्ठान भोरखेडा तसेच युवामंच मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments