adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना ग्रामीण आज दिनांक 21/01/2026 पासून बेमुदत संपावर...... (महाराष्ट्र राज्य ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटना चेही मानधन अभावी बेमुदत कामबंद आंदोलन)

 महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना ग्रामीण आज दिनांक 21/01/2026 पासून बेमुदत संपावर...... (महाराष्ट्र राज्य ग्रामीण गृहनिर्माण...

 महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना ग्रामीण आज दिनांक 21/01/2026 पासून बेमुदत संपावर......

(महाराष्ट्र राज्य ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटना चेही मानधन अभावी बेमुदत कामबंद आंदोलन) 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 महाराष्ट्र राज्य घरकुल कंत्राटी कर्मचारी संघटना राज्य स्तर, विभाग स्तर, जिल्हा  व तालुका स्तरावरील कर्मचारी आजपासून संघटनेच्या विविध मागण्या साठी काम बंद आंदोलन पुकारले आहे, आज ४ महिने पूर्ण होण्यास आलेले असून अजूनही मानधन मिळालेले नाही त्यामुळे घरकुल चे गृहनिर्माण अभियंता आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर हे एकत्रित समन्वयाने आज संपाचा चौथा दिवस. ते वेळेत उद्दिष्ट दिलेले पूर्ण करीत असतात पण मानधन त्यांना काही दर वेळेसच 4 ते 6 महिने महिने होत नाहीत. ओव्हर टाईम करून सुट्टी,दिवाळी सणासुदीच्या वेळेसही कंपनी बदल होऊन दर वेळेस नवीन कंत्राटदार कडे सर्व घरकुल कंत्राटी कामगारांना नियुक्ती पत्रक,त्यांचे पेमेंट साठी चा नियम अटी पूर्ण करूनही ग्रेज्युती,आरोग्य पॉलिसी, तसेच इतर कामगार कायदे नुसार महिला यांना प्रसूती रजा, वयाची 58 वर्षापर्यंत रोजगाराची हमी, घरकुल कंत्राटी कर्मचारी यांनी आपले आयुष्याचे 10 -12 वर्ष दिलेले त्यांना शासनाच्या सेवेत सामावून घेऊन ,शासनाच्या होणारे परीक्षा मध्ये त्यांना सवलत मिळावी. ह्यासाठी नागपूर अधिवेशनात महाशय ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी चर्चा साठी बोललेले 15 दिवसांनी परंतु अधिवेशन पूर्ण होऊन 1 महिन्याचे वर होऊनही शासनाने सदर घरकुल कंत्राटी कर्मचारी ग्रामीण यांना ना चर्चा साठी बोलावले ना 6 अडी अडचणी वर एकही पत्र व्यवहार ,पगार होणार यावर काहीच उत्तर दिले नाही. सदर कर्मचारी हे प्रधानमंत्री ,रमाई ,मोदी आवास,शबरी,पंडित दीनदयाळ जागा खरेदी,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत,अहिल्याबाई होळकर आवास योजना ग्रामीण,तसेच  गवंडी प्रशिक्षण कार्यक्रम,घरकुलांचे सर्व सर्वेक्षण पासून ते लाभार्थी चे घर पूर्ण करून त्यांना नामफलक लावणे पर्यंत सर्व कामकाज करीत असतात जे जॉब चार्ट चे बाहेर कामे आहेत इतर वाढीव कामासहीत  तांत्रिक अडचणी ना सामोरे जावून, लाभार्थीना योग्य ते अडचण दूर करतात. पण शासन ना त्यांची तांत्रिक पेमेंट ची अडचण सोडवते ना लाभार्थीना वेळेवर पेमेंट देते. त्यांचा रोष घरकुल कर्मचारीवरच हे शेवटी काम असून करीत आहेत पण त्यांनाही स्वतःचा कामाचा मोबदला 6 महिने पर्यंत देत नाहीत . त्याकरणा स्तव सर्व महाराष्ट्रातील घरकुल कर्मचारी ,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटना,महात्मा गांधी रोजगार हमी योजना(बी व्ही जी रामजी)कर्मचारी संघटना हि एकत्रित संपावर दिसून येत आहेत.त्यांचे शासनाने दखल घ्यावी.अडीअडचणी न सुटल्याने यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यास्तव हिवाळी अधिवेशन काळात ठिय्या आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, तसेच मंत्री महोदय यांनी मीटिंग लाऊन तोडगा काढ्याबाबत आश्वस्त केले होते परंतु अद्याप पर्यंत मीटिंग झाली नसल्याने तसेच अद्याप पर्यंत मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने सर्व कर्मचारी यांनी दिनांक 21 जानेवारी पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी यांनी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक, गट विकास अधिकारी सर्व यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तरी शासनाने त्यांचे अडीअडचणी त्वरित सोडवावेत आणि घरकुल चे लाभार्थी ची होणारी गैरसोय टाळावी.मागण्या पूर्ण न झाल्यास संप आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिलेला आहे.राज्यभर सुरू झालेल्या या काम बंद आंदोलनाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील गरीब व गरजू लाभार्थ्यांच्या घरकुल योजनांवर होत असल्याने शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची जोरदार मागणी होत आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य घरकुल कर्मचारी संघटना चे अध्यक्ष श्री महेन्द्र देवरे,ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री आकाश जैस्वाल,तसेच जळगाव जिल्हा साठी चे सर्व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर हे एकत्रित जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव मुख्यालयी येथे निवेदन साठी जमा झालेले होते.

No comments