33, आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनात "छुळेवण्या वातरा" या पुस्तकाचे प्रकाशन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) 33, ...
33, आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनात "छुळेवण्या वातरा" या पुस्तकाचे प्रकाशन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
33, वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन, चेनपूरा तह. नेपानगर, जिल्हा ब-हानपूर ( मध्यप्रदेश) येथे दिनांक १३,१४,१५, जानेवारी २०२६ रोजी आदिवासी एकता परिषद, अंतर्गत ,३३ वा आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन नुकताच पार पडला.
सदर आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनात आदिवासी संस्कृतीचा मौखिक ठेवा साहित्यात पदार्पण करणारे लेखक श्री. भिमराज होजा-या पावरा यांचे नवीन पुस्तक " छुळेवण्या वातरा ( कोडे, पहेली) नाविन्यपूर्ण उपक्रम पुस्तिका बालगट भाषा - पावरी, अनुवाद: मराठी, हिंदी हे पुस्तक अखिल महाराष्ट्र आदिवासी जनजागृती संघटनेचे अध्यक्ष- महेंद्र पावरा यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित करण्यात आले. त्यासोबतच सचिव जितेंद्र पावरा, कवि- प्रेम भंडारी, संपादक - आदिवासी संस्कृती दिनदर्शिका- संतोष पावरा, विकास मुखडे, किसन पावरा, दिनेश पावरा, विकास तरोले, यांची देखील उपस्थिती लाभली.
मा अध्यक्ष यांनी बोलतांना सांगितले "छुळेवण्या वातरा" हे पुस्तक बाल गटांना बुध्दीला चालना मिळण्यासाठी खूप आवश्यक आहे. तसेच पावरांचे मौखिक साहित्य लिखित स्वरूपात उपलब्ध केले. याबाबत देखील शुभेच्छा व्यक्त केल्या. उपस्थित मान्यवरांनी आदिवासी एकता सांस्कृतिक चहाचे महासंमेलनात आलेल्या लोकांना आदिवासी संस्कृती जपूया, शिक्षित होऊया, पुस्तक रूपी ज्ञान आत्मसात करुया, जल जंगल जमीन वाचवूया असा मोलाचा संदेश दिला. प्रकाश पावरा यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.


No comments