adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहील्यानगरमध्ये भाजप-युतीची विजयाची हॅट्रीक..! मुख्यमंत्री फडणवीसांचा दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांचे केले अभिनंदन

 अहील्यानगरमध्ये भाजप-युतीची विजयाची हॅट्रीक..! मुख्यमंत्री फडणवीसांचा दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांचे के...

 अहील्यानगरमध्ये भाजप-युतीची विजयाची हॅट्रीक..! मुख्यमंत्री फडणवीसांचा दूरध्वनीवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार संग्राम जगताप यांचे केले अभिनंदन 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहील्यानगर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस युतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून पालकमंत्री तथा महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेले यश म्हणजे भाजप-युतीची विजयाची हॅट्रीक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

हा विजय विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अहील्यानगरच्या जनतेला समर्पित करत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, डॉ. सुजय विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहीते, विनायक देशमुख, सुनील रामदासी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहरातील आशीर्वाद बंगल्यावर मंत्री विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवक व युतीच्या कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष साजरा केला. भगव्या गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत ऐतिहासिक विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.पत्रकार परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून मंत्री विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे पाटील यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.


ही निवडणूक आमदार संग्राम जगताप आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. “विकासाची स्पष्ट भूमिका घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो होतो. जनतेने भाजप-राष्ट्रवादी युतीवर प्रचंड विश्वास दाखवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहील्यानगरच्या सभेत दिलेला विजयाची हॅट्रीक पूर्ण करण्याचा शब्द आजच्या निकालाने पूर्ण झाला,” अशी भावना मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मिळणारे सातत्यपूर्ण यश हे जनतेने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट संकेत आहेत. मुंबई-पुणे महापालिकांप्रमाणेच इतर शहरांमध्येही महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासात्मक बदलांना जनतेने स्वीकारले असल्याचे या निकालातून दिसून येते, असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असे आपण निवडणुकीपूर्वीच सांगितले होते आणि तेच निकालातून स्पष्ट झाले असल्याची टीका त्यांनी केली. “झोपेतून उठून निवडणूक लढवण्याचे दिवस आता संपले आहेत. पराभव झाला की निवडणूक आयोग आणि ईव्हीएमवर टीका करण्यापलीकडे महाविकास आघाडीकडे कोणताही ठोस अजेंडा नाही,” असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.अहील्यानगर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे पाठबळ दिले असून नगरपालिकेप्रमाणेच महापालिकेतही भाजपाचा स्ट्राइक रेट कायम राहिला आहे. या विजयावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपाला मोठे यश मिळेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

No comments