adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर द्वेषपूर्ण मजकूर; Atrocity Act अंतर्गत गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप? रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना निवेदनाद्वारे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर द्वेषपूर्ण मजकूर; Atrocity Act अंतर्गत गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप...

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर द्वेषपूर्ण मजकूर; Atrocity Act अंतर्गत गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप?

रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना निवेदनाद्वारे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा व परिसरातील बौद्ध समाजबांधव, संविधाननिष्ठ व कायद्यावर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अपमानास्पद व द्वेषपूर्ण मजकूर प्रसारित करणाऱ्या आरोपीविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा, १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात पोलिसांकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात रावेर लोकसभेच्या खासदार व केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना निवेदन सादर करून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, दिनांक ०२ जानेवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता दिलीप लक्ष्मण नेवे (रा. भाटगल्ली, चोपडा) याने फेसबुक या सोशल मीडिया माध्यमावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात खोटी, बदनामीकारक, अपमानास्पद व जातीय द्वेष निर्माण करणारी पोस्ट जाणीवपूर्वक शेअर केली. या पोस्टमुळे बौद्ध समाजाच्या धार्मिक व सामाजिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून समाजात असंतोष व तेढ निर्माण झाली आहे. तसेच दोन समाजघटकांमध्ये द्वेष पसरवण्याचा स्पष्ट प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम १९६ (१)(a), ३५३(२), ३५६(२) व ३५६(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र सदर कृत्य स्पष्टपणे अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा, १९८९ अंतर्गत येत असतानाही अद्याप Atrocity Act अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आलेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

निवेदनात कायदेशीर बाबींचा उल्लेख करताना सांगण्यात आले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अनुसूचित जाती समाजाचे महानायक व भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रतिमेचा सार्वजनिक अपमान हा SC/ST Atrocity Act च्या कलम ३(१)(r) व ३(१)(u) अंतर्गत दखलपात्र गुन्हा असून, या कायद्यानुसार कोणतीही प्राथमिक चौकशी न करता थेट एफआयआर नोंदवणे बंधनकारक आहे. तरीही पोलिसांकडून होत असलेली दिरंगाई ही गंभीर बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बौद्ध समाजाच्या भावना व्यक्त करताना निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ व्यक्ती नसून ते बौद्ध समाजाचा आत्मसन्मान, अस्मिता व संविधानिक अस्तित्व आहेत. त्यांचा अपमान म्हणजे संपूर्ण बौद्ध समाजाचा अपमान असून Atrocity Act लागू न करणे हे न्याय नाकारण्यासारखे आहे.

खासदार रक्षा खडसे यांना करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये संबंधित पोलीस प्रशासनाला अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायदा, १९८९ अंतर्गत तात्काळ एफआयआर नोंदविण्याचे निर्देश द्यावेत, प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी तसेच आरोपीस कोणतेही राजकीय अथवा प्रशासकीय संरक्षण मिळू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. योग्य कारवाई न झाल्यास माननीय न्यायालयात दाद मागणे, तसेच राष्ट्रीय व राज्य अनुसूचित जाती आयोग आणि मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी निवेदनावर समाधान सपकाळे, अनिता बाविस्कर, बबीता बाविस्कर, ललिता बाविस्कर, दीपक करनकाळ, निलेश सपकाळे, चेतन सोनवणे, प्रशांत सोनवणे, आदर्श भालेराव व आनंद वाघ यांच्यासह अनेक बौद्ध समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments