यावल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात युवकांचे व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व विषयावर प्रेरणादायी व्याख्यान भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपाद...
यावल महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात युवकांचे व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व विषयावर प्रेरणादायी व्याख्यान
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कवयित्री बहिणाबाई चौधरी,उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत,जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथे प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि.०२ जानेवारी २०२६ ते ०८ जानेवारी २०२६ या कालावधीत दत्तक गाव सांगवी येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात “पाणी वाचवा, जीवन वाचवा”, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता अभियान व साक्षरता या विषयांवर जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान स्वयंसेवकांनी प्रभावी घोषवाक्ये देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. तसेच गावातील चौकात “पाणी वाचवा, जीवन वाचवा” या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.
रॅलीची सुरुवात सार्वजनिक मंगल कार्यालय येथून होऊन सांगवी गावातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ व मोहल्ल्यांतून मार्गक्रमण करत पुन्हा सार्वजनिक मंगल कार्यालय येथे सांगता झाली.
रॅलीच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.व्ही.पावरा, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.टी. वसावे,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.एस. शिरसाठ तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
शिबिराच्या दुसऱ्या सत्रात “युवकांचे व्यक्तिमत्व विकास व नेतृत्व” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्त्या सौ.जयश्री काळवीट (उपशिक्षिका) यांनी व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ बाह्य सौंदर्य नव्हे,तर विचार, वर्तन आणि कौशल्यांचा समन्वय साधून स्वतःला सक्षम बनवणे होय, असे मार्गदर्शन केले.
दुसरे वक्त्या प्राध्यापिका पी.व्ही.रावते यांनी युवकांनी अधिकाधिक पुस्तक वाचन करावे तसेच नेतृत्व म्हणजे केवळ पद अथवा अधिकार नसून इतरांना प्रभावित करून त्यांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिक्षा वाघ होत्या. त्यांनी युवकांनी आपल्या आयुष्यात व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.व्ही. पावरा,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.सी.टी.वसावे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. आर.एस.शिरसाठ,माजी कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी. पवार,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा. नागेश्वर,प्रा.हेमंत पाटील, प्रा. प्रशांत मोरे,श्री.प्रमोद जोहरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी बडगुजर यांनी केले,पाहुण्यांचा परिचय डिंपल भालेराव हिने करून दिला तर आभार प्रदर्शन दुर्गेश्वरी कोळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.

No comments