adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हळदी कुंकाला जाताय, आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्या:- पोलिस हवालदार प्रमिला निकम यांच्याकडून महिलांना संदेश!

 हळदी कुंकाला जाताय, आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्या:- पोलिस हवालदार प्रमिला निकम यांच्याकडून महिलांना संदेश!   संभाजी पुरीगोसावी (पु...

 हळदी कुंकाला जाताय, आपल्या मौल्यवान दागिन्यांची काळजी घ्या:- पोलिस हवालदार प्रमिला निकम यांच्याकडून महिलांना संदेश! 


 संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाणेकडील प्रभारी अधिकाऱ्यांसह पोलीस ठाणेकडील सर्व स्टाफ आपल्या परिसरांत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. सध्या नुकतेच नवीन वर्षाला सुरुवात झाली असून आणि याच वर्षाची सुरुवात ही मकर संक्रांत या सणापासून होत असतं. आणि याच पार्श्वभूमीवर मकर संक्रातीच्या सणानंतर अनेक ठिकाणी महिलांसाठी हळदी-कुंकवाच्या  कार्यक्रमाचे आयोजित केले जातात. हा कार्यक्रम संध्याकाळीच प्रत्येक महिलांच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा भरवला जातो. आपण जर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला जात असाल तर महिलांनी मौल्यवान दागिन्यांची काळजी नक्कीच घेतली पाहिजे तसेच संशयास्पद काही निदर्शनास आल्यास राजगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिस हवालदार प्रमिला निकम यांनी केले आहे. पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस प्रशासन आणि  राजगड पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार प्रमिला निकम यांनी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागातील महिलांना आवाहन केले आहे. तसेच कार्यक्रमाला जाताना महिलांनी शक्यता एकटे न जाता, महिला ग्रुपने जावे. आम्ही पोलिस आहोत पुढे तपासणी चालू आहे. आपले दागिने काढून ठेवा, किंवा मोटरसायकल वरून येणारे चोरटे अशा कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसून आल्या तर तत्काळ आपल्या राजगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस प्रशासन आणि राजगड पोलीस ठाणे महिलांच्या कायम पाठीशी आहे. महिलांना कोणती अडचण भासल्यास किंवा तत्काळ मदतीसाठी डायल 100/112 किंवा 02113/272233  पोलीस हवालदार प्रमिला निकम मोबाईल क्रमांक 9881316191  संपर्क साधावा... असेही आवाहन पोलीस हवालदार प्रमिला निकम पोलीस यांनी केले आहे.

No comments