adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पारोळा येथे नासिक विभाग ग्रंथालय संघ व जळगांव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

 पारोळा येथे नासिक विभाग ग्रंथालय संघ व जळगांव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न  विका...

 पारोळा येथे नासिक विभाग ग्रंथालय संघ व जळगांव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पारोळा : येथे दि १८/०१/२०२६रोजी नाशिक विभाग ग्रंथालय संघ व जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक  अधिवेशनाचे उद्घाटन नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक गाडेकर संचालक ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र होते यावेळी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ गजानन कोटेवार, उपनगराध्यक्ष रोहन मोरे, देवगांवचे आदर्श सरपंच समीर पाटील डॉ शांताराम पाटील नगरसेवक छोटू पाटील, जळगांव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील जगताप पारोळा पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे  रामदास शिंदे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अहिल्यानगर,  धर्मसिंह वडवी जिल्हा ग्रंथालय अधिकारी नंदुरबार, जगदीश पाटील जिल्हा ग्रंथालय अधिकारी धुळे, चंद्रशेखर ठाकूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी जालना अनिल बाविस्कर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संभाजीनगर जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सतीश पाटील पारोळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांच्या सह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते 

 ग्रंथालय वार्षिक अधिवेशन पारोळा येथे पार पडले या निमित्त परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ग्रंथ दिंडी काढूण ग्रंथाचे पूजन करून 

 कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील सरपंच समीर पाटील महेंद्र बोरसे डॉ शांताराम पाटील यांच्यासह मान्यवरांनी ग्रंथालय चालवताना येणाऱ्या अडीअडचणी समस्या व  विविध विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले  प्रस्ताविक विभागीय अध्यक्ष डॉ दत्ता परदेशी सतीश दशरथ पाटील यांनी केले  ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी शासनाच्या विविध योजना राबविण्या बाबतीत मार्गदर्शन केले व ग्रंथालय संघाचे राज्य अध्यक्ष डॉ गजानन कोठेवार यांनी ग्रंथालयाच्या विविध समस्या व प्रमुख मागण्या व समस्या विषयावर सविस्तर भाषण केले यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले व.ग्रंथ प्रदर्शनाचे स्टॉल कस्तुरी प्रकाशन चे  गोकुळ बागुल सर, व इंगळे मॅडम, साप्ताहिक कुंभ विकास यांचे स्टॉल लावण्यात आले होते 

सुरुची स्नेहभोजन झाल्यानंतर दुपारी २ते ३ वाजे दरम्यान व्याख्यान वाचन संस्कृतीची आवश्यकता या बाबत प्रा लिलाधर शिवाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले 

या कार्यक्रमाला जळगाव धुळे नंदुरबार अहिल्यानगर नाशिक येथून अविनाश भदाणे रोहिदास हाके प्रवीण पाटील संभाजी पवार, सचिन जोपुळे सहाय्यक संचालक ग्रंथालय संचनालय महाराष्ट्र, प्रशांत पाटील सहायक संचालक ग्रंथालय संचालक मुंबई, जळगांव जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे, सुनील जगताप नाशिक रामदास शिंदे अहिल्यानगर धरमसिंग वडवी नंदुरबार जगदीश पाटील धुळे,अनिल बाविस्कर संभाजीनगर चंद्रशेखर ठाकूर जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी इत्यादी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, किशोर पाटील, सागर भगुरे, किरण बडगुजर, मनोज पाटील, दिगंबर पाटील, पी बी पाटील सर रवींद्र पाटील अजनविहीरे, संजय पाटील चौबारी,कविता पाटील, योगेश पाटील, दिपक पवार सुकलाल पाटील यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन राधेश्याम पाटील चोपडा यांनी केले तर शेवटी समारोप आभार प्रदर्शन पारोळा तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील  यांनी केले व राष्ट्रगीताने सांगता झाली

No comments