adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल व्यापारी बांधव व समाजसेवकांच्यावतीने प्रवीण सावरकर यांचा जाहीर सत्कार

  स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल  व्यापारी बांधव व समाजसेवकांच्यावतीने प्रवीण सावरकर यांचा जाहीर सत्कार    वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी ...

 स्विकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल व्यापारी बांधव व समाजसेवकांच्यावतीने प्रवीण सावरकर यांचा जाहीर सत्कार  


 वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील संत्रानगरी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या वरुड शहरातील लोकप्रिय सांयदैनिक वरुड केसरी या वृत्तपत्राचे संपादक तसेच नाभिक समाजाचे प्रतिनिधी प्रवीण सावरकर यांची वरुड नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल येथील व्यापारी बांधव व समाजसेवक मंडळींच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी लोकनेते आमदार उमेश ऊर्फ चंदुभाऊ यावलकर यांचे समस्त वरुडकरांच्या वतीने आभार मानण्यात आले. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राजकीय व सामाजिक प्रवाहात आणण्याचे प्रामाणिक कार्य आमदार उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांनी केले असून, त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा परिचय यानिमित्ताने सर्वांनाच झाला असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. प्रवीण सावरकर यांच्या सामाजिक, पत्रकारिता व समाजहिताच्या कार्याची दखल घेत आमदार उमेश यावलकर यांनी त्यांना संधी दिली असून, ही त्यांच्या कार्याची पावती असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


त्यामुळे स्विकृत नगरसेवक प्रवीण सावरकर यांचा जाहीर सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी कैलासजी उपाध्याय, शिवनारायणजी उपाध्याय, डॉ. पवन उपाध्यय, केतन उपाध्याय, समाजसेवक कुमार आंडे, श्री. वानखडे , नंदकिशोर आजनकर, राजेंद्र धानोरकर, गोल्ड मेडलिस्ट अमोल सोटे, पत्रकार निखिल बावणे, तुषार खासबागे, रणजित माकोडे, तुषार शिंगरवाडे, रोशन माखिजा, डॉ‌ आनंद झामडे, डॉ. सौरभ पोहरकर, डॉ.निलेश बरडे, हरिष कानुगो, मोरेश्वर वानखडे, दुर्गादास शेगेकर, धनराज इंगळे, प्रदिप गणोरकर, सुदेश मेंघांनी, विक्की लोंढे यांच्यासह सर्व व्यापारी बांधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री.सावरकर यांच्या भावी कार्यास सर्वांनी शुभेच्छा देत वरुड नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यासाठी मोलाचा सल्ला दिला. हा सत्कार कार्यक्रम शहराच्या विकासासाठी सकारात्मक दिशेने वाटचाल करणारा ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments