adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूर: शिवसेनेच्या सततच्या प्रयत्नाने अखेर मौजे दाताळा ता. मलकापूर येथील शेतकऱ्यांची शेतीशी तुटलेली नाळ अखेर पुनश्च जुळली.

 मलकापूर: शिवसेनेच्या सततच्या प्रयत्नाने अखेर मौजे दाताळा ता. मलकापूर येथील शेतकऱ्यांची शेतीशी तुटलेली नाळ अखेर पुनश्च जुळली.   अमोल बावस्का...

 मलकापूर: शिवसेनेच्या सततच्या प्रयत्नाने अखेर मौजे दाताळा ता. मलकापूर येथील शेतकऱ्यांची शेतीशी तुटलेली नाळ अखेर पुनश्च जुळली.  


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दाताळा ता. मलकापुर जि. बुलडाणा दाताळा भाग २ श्री. एकनाथ ज्ञानदेव पाटील यांच्या शेता जवळील नळगंगा नदी पात्रामधील रस्ता पावसाळ्यात सतत पाणी तुंबल्यामुळे बंद होत होता, हा रस्ता सुरू करण्यासाठी शेतकर्‍यांनी प्रचंड आंदोलन केल्यानंतर नदीपात्रामध्ये हयुम पाईप बॉक्स कल्व्हर्टचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत करण्यात आले. बांधलेल्या पुलाचे काम हे कमी उंचीचे व त्यामध्ये टाकलेले सिमेंट पाईप हे लहान आकाराचे आहेत, तसेच फक्त थोडेच पाईप टाकलेले आहेत. लांबी कमी असल्यामुळे दोन्ही कडील काठ पावसाळ्यात खचून गेले व गावातून पलीकडे शेतीत जाण्याकरिता रस्ताच वाहून गेला. सदर समस्येबाबत गावकऱ्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांना कळविले त्यांनी शिवसेनेच्या आक्रमक शैलीतून अधिकाऱ्यांना वेठीस धरले एकदा तर चक्क बुलढाणा पालकमंत्री ना. मकरंद आबा पाटील यांना घेराव घातला व सदर कामाची तात्पुरती दुरुस्ती तत्काळ करून दिली परंतु नळगंगा धरणातील पाणी क्षमतेपेक्षा अतिरिक्त झाल्यामुळे धरणातील गेट उघडण्यात आले होते त्यामुळे परत सदर रस्ता वाहून गेला होता. 

त्यावर पुन्हा दिपक पाटील यांनी बुलढाणा येथ मृद व जलसंधारण विभागाला गावकरांसह धडक देत शेतकऱ्यांचा शेतीशी संपर्क जोडण्याबाबत ठनकावले त्यावर दि. १८/०१/२६ रविवार रोजी मुरमाचा भराव टाकून तात्पुरती येण्या जाण्याची व्यवस्था शासनातर्फे कुठलीही निविदा न काढता करून देण्यात आली आहे. यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड उत्साहित व नवचैतन्याचे वातावरण गावामध्ये दिसले, आता शेतातील तूर हे त्यांच्या घरी आणण्यास रस्ता मोकळ्या झाला आहे. शेतकऱ्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील तसेच त्यांना सहकार्य केलेल्या सर्व पत्रकार बांधव तथा इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे आभार पुरुषोत्तम पाटील, किशोरसिंह राजपूत, कैलास इंगळे, भगवान नारखेडे, गजानन सुषिर, सुभाष पाटील, प्रवीण तळोले, सोपान नारखेडे, प्रवीण पाचपोर, ज्ञानेश्वर लवंगे, अतुल सिंह राजपूत, सोपान नारखेडे, निलेश सुषिर, कुलदीप सिंह राजपूत, व समस्त गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

No comments