adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

थेपडे विद्यालय, म्हसावद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विविध उपक्रमांनी परिसर देशभक्तीमय

थेपडे विद्यालय, म्हसावद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा विविध उपक्रमांनी परिसर देशभक्तीमय   जळगाव जिल्हा प्रतिनिधी : समाधान पाटील (संपाद...

थेपडे विद्यालय, म्हसावद येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

विविध उपक्रमांनी परिसर देशभक्तीमय 




 जळगाव जिल्हा प्रतिनिधी : समाधान पाटील

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक संविधान उद्देशिकेच्या वाचनाने करण्यात आली. त्यानंतर क्रीडा शिक्षक श्री. गिरासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. संचलनानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जी. डी. बच्छाव यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर भारत स्काऊट व गाईड ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. स्काऊट मास्टर श्री. पी. पी. मगरे यांनी संचलन करत उपमुख्याध्यापक श्री. एस. के. भंगाळे यांना आमंत्रित केले.

त्यांच्या हस्ते स्काऊट ध्वज फडकविण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय एकात्मतेसह सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ‘बालविवाह विरोध’, ‘तंबाखूमुक्त शाळा’ आणि ‘असाक्षर मुक्त गाव’ या विषयांवर उपस्थित सर्वांना शपथ देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच श्री. गिरासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक संगीत कवायतीचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. याच दिवशी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेतही ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास द्वारकाबाई थेपडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. संगीता चव्हाण, एस. एन. डी. टी. महिला विद्यालय व डी. टी. एड. कॉलेजचे प्राचार्य श्री. ए. एस. गोसावी, शिक्षक प्रतिनिधी श्री. सचिन चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. जे. पवार यांनी केले, तर कार्यक्रमाची रूपरेषा पर्यवेक्षक श्री. के. पी. पाटील यांनी आखली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments