दिपप्रकाश करियर अकॅडमी तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायक...
दिपप्रकाश करियर अकॅडमी तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वानिमित्त दिपप्रकाश करियर अकॅडमीच्या वतीने देशभक्तीपर व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर शिवगर्जना देत पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाजवळ पारंपरिक लाठीकाठी व तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या वेळी अवघ्या ३ वर्षांच्या परी सुनील धनगर हिने लाठीकाठी व तलवार फिरवण्याचे प्रात्यक्षिक सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे हाताला दुखापत असतानाही इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या पलक राजपूत हिने धाडसाने काठी फिरवून उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांची दाद मिळवली.
यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे, देशभक्तीपर नृत्य, गाणी तसेच निबंध वाचन अशा विविध कार्यक्रमांतून देशप्रेमाची भावना प्रभावीपणे मांडली. प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील कला, आत्मविश्वास व राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले. या कार्यक्रमास पत्रकार विश्राम तेले, गोपाळ धनगर यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व दिपप्रकाश करियर अकॅडमीच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त व सांस्कृतिक मूल्यांची जोपासना झाली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


No comments