मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांची अंतराळभरारी; इस्रो भेट व बालवैज्ञानिक पुरस्कारासाठी घवघवीत निवड मंगेश निळे सरांच्या, श्री समर्थ सायन्स क्ला...
मुक्ताईनगरच्या विद्यार्थ्यांची अंतराळभरारी; इस्रो भेट व बालवैज्ञानिक पुरस्कारासाठी घवघवीत निवड
मंगेश निळे सरांच्या, श्री समर्थ सायन्स क्लासेस, निळे कोचिंग अकॅडमी च्या विद्यार्थ्यांची गगनभरारी
मुक्ताईनगर प्रतिनिधी : सतीश गायकवाड
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर :- डॉ. होमी भाभा फाउंडेशन (मुंबई), भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), श्रीहरीकोटा तसेच मुक्ताईनगर येथील श्री मंगेश निळे सरांचे श्री समर्थ सायन्स क्लासेस – निळे कोचिंग अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मुक्ताईनगर व परिसरातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून तृतीय क्रमांक प्राप्त करणारे चिरंजीव शौर्य नरेंद्र वराडे यांची बालवैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड झाली असून, त्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), श्रीहरीकोटा येथे शैक्षणिक भेटीसाठीही निवड करण्यात आली आहे.
![]() |
| कु. प्रांजल सचिन महाजन जळगाव जिल्ह्य़ातून प्रथम बालवैज्ञानिक पुरस्कार |
![]() |
| कु.कृष्णाली संदीप पालवे जळगाव जिल्ह्य़ातून द्वितीय बालवैज्ञानिक पुरस्कार |
मुलींच्या गटातून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. प्रांजल सचिन महाजन प्रथम तसेच द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या कु. कृष्णाली संदीप पालवे या विद्यार्थिनींचीही बालवैज्ञानिक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्री मंगेश निळे सरांच्या श्री समर्थ सायन्स क्लासेस – निळे कोचिंग अकॅडमी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, निवड झालेले सर्व विद्यार्थी हे निळे सरांच्या क्लासचेच आहेत. या यशामुळे मुक्ताईनगर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक मंगेश निळे सरांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
![]() |
| चि.समर्थ शिवाजीराव वंजारी भुसावळ विभागातून द्वितीय बालवैज्ञानिक पुरस्कार |




No comments