पाडळसा मोर नदी कोणाच्या अखत्यारीत? अवैध गौण खनिज कारवाई (जळगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर हमीद तडवी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्य...
पाडळसा मोर नदी कोणाच्या अखत्यारीत? अवैध गौण खनिज कारवाई
(जळगाव जिल्हा क्राईम रिपोर्टर हमीद तडवी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील मोर नदी शिवारात महसूल प्रशासनाने दि. २० जानेवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अवैध गौण खनिजभरताना मोठी कारवाई केली त्या चार डंपर एक पोकलैंड जप्त केले. मात्र यामागील खरे रहस्य जनतेसमोर येणे महत्त्वाचे आहे.
भुसावळ ते आमोदा साखर कारखाना हा रस्ता शासनाच्या अखत्यारित एका ठेकेदारांमार्फत भराव व काँक्रिटीकरण चे काम सुरू आहे. या ठेकेदाराला शासनाने परस्पर त्याच्या मंजूर रकमेतून रॉयल्टी जरी मिळत असली तरी त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणाहून खारवा व गौण खनिज उचलता येते मात्र या ठिकाणी मोर नदी पात्रात पाडळसे शिवारात जे गौण खनिज उचलले जात आहे त्याबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे. महसूल प्रशासनाचे संबंधित तलाठी व सर्कल इतरत्र कोणाच्याही ट्रॅक्टरमध्ये वाळू आढळल्यास
लगेच पकडून दंड करतात मग एवढी मोठी राजरोसपणे नदीपात्रात खोदकाम चालू असताना व वाहतूक सुरू असताना त्यांनी याकडे लक्ष का दिले नाही? या संदर्भात तहसीलदार आणि प्रांत अधिकारी नव्हे तर जिल्हा अधिकारी यांनी संबंधित ठिकाणी येऊन खोदकाम केलेल्या ठिकाणी किती खारवा व माती वाहिली गेली याचा पंचनामा होणे गरजेचे असून संबंधितांकडून जर परवाना नसेल तर या ठिकाणी कोणाच्या आशीर्वादाने ? सदरची खोदकाम सुरू होते याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे. महसूलने तर कारवाई केलीच डंपर व पोकलैंड यावल तहसील कार्यालयाला लावले दंडात्मक कारवाई होईल पंधरा लाखाच्या वर महसूलच्या तिजोरी मध्ये वसुली जमा होईल मात्र सदरच्या कारवाई एवढे मोठे उत्खनन महसूलच्या कर्मचाऱ्यांना का दिसले नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.


No comments