adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न

 यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  यावल:- येथील जळगाव जिल्हा मरा...

 यावल महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल:- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.एम. डी. खैरनार यांचे "अंदाजपत्रकाचे महत्व " या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.

  यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यूएसी समन्वयक डॉ.एच. जी.भंगाळे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.    

       प्राध्यापक प्रबोधिनीचे अकरावे पुष्प गुंफतांना प्रा.एम.डी.खैरनार यांनी कोणताही देश,संस्था वा व्यक्ती असो त्यासाठी अंदाजपत्रक हे अतिशय महत्वाचे असते.अंदाजपत्रकात  उत्पन्न व खर्चाबरोबरच तरतूदिचाही समावेश असतो. सरकारचे अंदाजपत्रक हे संतुलित,आधिक्याचे व तुटीचे असे तिन प्रकारचे असते असे सांगून त्यांनी प्रत्येक प्रकाराविषयी सविस्तर माहिती सांगितली.तसेच सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.एच.जी.भंगाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोणत्याही देशाचे अंदाजपत्रक हे त्या देशाचा आरसा असतो.एखाद्या देशाचे विशिष्ट परिस्थितीतील अंदाजपत्रक हे त्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील पत ठरवित असते आणि या पतच्या आधारवरच त्या देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्ज उपलब्ध होतं असते असे सांगितले.

      सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक प्रबोधिनीच्या समन्वयिका डॉ.वैशाली कोष्टी यांनी केले तर आभार प्रा.रूपाली शिरसाठ यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने प्राध्यापक उपस्थित होते.

No comments