ऐतिहासिक फैजपूर शहराशी अजित दादांचे जिव्हाळाचे नाते होते शोक सभेत मान्यवरांचे सूर इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) “अजि...
ऐतिहासिक फैजपूर शहराशी अजित दादांचे जिव्हाळाचे नाते होते शोक सभेत मान्यवरांचे सूर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“अजितदादांचे अशा अपघातात जाणे आजही मनाला पटत नाही. स्पष्टवक्ते, निर्भीड आणि निर्मळ असा एक कर्तृत्ववान नेता महाराष्ट्र शासनाचा आधारस्तंभ आपण गमावला आहे ऐतिहासिक फैजपूर शहराशी अजितदादांचे अतिशय जिव्हाळ्याचा स्नेहबंध होता
शहराचे विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहेत सर्वांगीण विकासात तरुणांना मार्गदर्शन पाठबळ राहिले आहे त्यांचे राष्ट्र व समाजाच्या सर्वोतोपरी उत्थानासाठी त्यांचे कामकाज तरुणांनी व राजकिय नेत्यांनी आत्मसाद करून राष्ट्र समाज च्या विकासासाठी समर्पित भावनेनं वाहून घेणं हीच खरी श्रद्धांजली राहील असे प्रतिपादन रामराज्य सेवाभावी संघ शुभदिव्य मंगल कार्यलय येथे दिनांक ३१ जानेवारी रोजी आयोजित सार्वजनिक शोकसभा श्रद्धांजली सभेत उपस्थितांन तर्फे जम्मू काश्मीर दौढा येथील सैनिक वाहन अपघातात १० जवानांना वीर मरण प्राप्त झाले तसेच बारामती विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीतदादा पवार ,त्यांचे सोबत प्रवासात असलेले कॅप्टन सुमित कपूर ,कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईड अटेंडन्ट पिंकी माळी, सुरक्षारक्षक विधीत जाधव यांनाप्राण गमवावे लागले
या सर्वांना रामराज्य सेवासंघ तर्फे व समस्त फैजपूर शहरवासीयां तर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
याप्रसंगी अजितदादांच्या फैजपूर दौरा आठवणींना उजाळा मिळाला आहे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या तैलचित्रास फैजपूर नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा दामिनी सराफ उपनगराध्यक्षा निकिता कोळी यांचे हस्ते माल्यार्पण करण्यात आले तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करीत दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
याप्रसंगी सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे,माजी नगराध्यक्ष निलेश राणे, मिलींद वाघुळदे, माजी उपनगराध्यक्ष प्रा जी पी पाटील हेमराज चौधरी, कलीमखान मणियार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन राणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान, नगरसेवक सूरज गाजरे, महेंद्र मंडवाले, पप्पू चौधरी केतन किरंगे, पवन सराफ, राहुल गुजराथी,ज्ञअनवर खाटीक, समाजसेवक नरेंद्र चौधरी, संदीप भारंबे, लखन इंगळे, आवेश भांज्या, चंद्रशेखर चौधरी, रवींद्र होले, रामा होले, किरण चौधरी पत्रकार वासुदेव सरोदे, नंदकिशोर अग्रवाल, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज, भाजपा शहराध्यक्ष पिंटूभाऊ तेली, शिवसेनेचे कैलास भोई, भाजपचे, डॉ नरेंद्र कोल्हे अमोल वारके, गणेश गुरव, संजय रल, यासह रामराज्य संस्था संचालक मंडळ,सार्वजनिक उत्सव समिती सदस्य, सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

No comments