मंत्री,आमदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोट्यावधींचा चुना लावून धूम ठोकणाऱ्या समीर नार्वेकर पोलिसांच्या जाळ्यात, माधवी राजेकुंभार यांच्या टीम...
मंत्री,आमदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोट्यावधींचा चुना लावून धूम ठोकणाऱ्या समीर नार्वेकर पोलिसांच्या जाळ्यात, माधवी राजेकुंभार यांच्या टीमची दमदार कामगिरी !
संभाजी पुरीगोसावी (ठाणे जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातावर पोट भरणारा कामगारांने सगळ्यांना जाळ्यात अडकवले; TWJ कंपनीच्या मालकांला अखेर अटक मंत्री,आमदार, खासदार अन् वरिष्ठ आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधीं रूपयांचा चुना लावून ‘धूम’ ठोकलेल्या आरोपी समीर नार्वेकरला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्रांतील सर्वात मोठ्या घोटाळेबाजाला अटक करण्यात आली आहे. हातावर पोट असणाऱ्यांपासून राज्यांतील बड्या राजकारणी,सत्तेतील मंत्री-आमदार आणि प्रशासनातील आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधीं रुपयांचा चुना लावून महाराष्ट्राबाहेर धूम ठोकलेल्या TWJ कंपनीचा मालक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर नार्वेकर,त्याची पत्नी नेहा नार्वेकर आणि संचालक अमीत पालम या तिघांना ठाणे पोलिसांच्या आर्थिंक गुन्हे शाखेने शुक्रवारी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस आणि राजकारण्यांची फसवणूक करून पळालेल्या आणि पोलिसांच्या नजरेत न येणाऱ्या समीर नार्वेकर आणि त्याच्या पत्नीच्याही मुसक्या आवळण्यात ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. राज्यभरांतील आठ जिल्ह्यांतून पोलिसांकडे समीर नार्वेकरच्या विरोधांत प्रचंड तक्रारी दाखल होत्या. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यावरून पोलिसांकडे बोट दाखवले जात होते. ठाणे पोलिसांवरही समीर नार्वेकरला पाठीशी घालत असल्याचा आरोपही पोलिसांवर होता. या प्रकरणातील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर माधवी राजेकुंभार आणि त्यांच्या टीमने आठवडाभर गुजरातमध्ये तळ ठोकून या प्रकरणातील आरोपी समीर नार्वेकर, त्याची पत्नी यांच्यासह तिघांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, यात डॅशिंग महिला ऑफिसरनेच ही कारवाई करून समीर नार्वेकर आणि त्याच्या कंपनीच्या काळ्या कारभारांचा पर्दाफाश केल्याचे दिसून आले आहे.
राज्यभरांतील आठ जिल्ह्यांतून पोलिसांकडे समीर नार्वेकरच्या विरोधात प्रचंड तक्रारी आल्या होत्या. तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्यावरून पोलिसांकडे बोट दाखवले जात होते. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त पराग मणेरे हे वेगवेगळ्या पध्दतीने तपास करण्याबाबत प्रयत्नशील होते.
या प्रकरणातील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर माधवी राजेकुंभार आणि त्यांच्या टीमने आठवडाभर गुजरातमध्ये तळ ठोकून होते. मंत्री,आमदार, खासदार अन् वरिष्ठ आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांना कोट्यवधीं रूपयांचा चुना लावून ‘धूम’ ठोकलेल्या समीर नार्वेकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्याने या प्रकरणातील आणखी काळेबेरे बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजेकुंभार यांच्यासह नितीन ओवळेकर, गुरुप्रसाद तोडणकर, निशिकांत पाटील,कविता कोळपे योगेश चौगुले यांचा टीममध्ये समावेश होता. तक्रारीनुसार, टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेडने लोकांना गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून आमिष दाखवले. शेअर बाजारांतील गुंतवणूक प्रशिक्षण देण्याचा, महाराष्ट्रात 16 शाखांचा समावेश करण्याचा आणि सरकारी प्रकल्पांसाठी मोठे कंत्राट मिळवण्याचा दावा करून त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला आहे.

No comments