adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; युवा चित्रकार अनिलराज यांची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनात निवड

चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; युवा चित्रकार अनिलराज यांची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनात निवड  चोपडा | प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...

चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; युवा चित्रकार अनिलराज यांची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनात निवड 


चोपडा | प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा शहराच्या कला क्षेत्रासाठी अभिमानास्पद अशी कामगिरी युवा चित्रकार अनिलराज यांनी पुन्हा एकदा साध्य केली आहे. वेस्ट बंगाल राज्यातील कोलकाता येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शन व स्पर्धेत त्यांचे श्री गणरायांचे “शिवरंग गणेशा” हे पेन-इंकच्या साह्याने स्टिपलिंग पद्धतीत साकारलेले चित्र निवडले गेले आहे.
हे प्रतिष्ठित चित्र प्रदर्शन कोलकाता येथील Utsaraga Welfare Society यांच्या कला दालनात भरविण्यात येणार असून, या प्रदर्शनात देशभरातील नामवंत व अनुभवी चित्रकारांची चित्रे निवडण्यात आली आहेत. सदर चित्र प्रदर्शनासोबत चित्र स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.
या प्रदर्शनातील निवड झालेल्या सर्व चित्रांची यादी कला दालनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रदर्शन ऑनलाईन स्वरूपातही कलारसिकांना पाहता येणार आहे. यासोबतच निवड झालेल्या चित्रांचे ऑनलाईन प्रमोशन देखील करण्यात येणार आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल चित्रकार अनिलराज यांना Creative Achievement Certificate प्रदान करून सन्मानित करण्यात आले असून, त्यांच्या निवड झालेल्या चित्राचे अधिकृत पोस्टरही प्रकाशित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनिलराज यांची वेस्ट बंगालमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून, ही बाब चोपड्यासाठी अभिमानाची आहे.
चित्रकार अनिलराज यांना पुणे येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार चंद्रशेखर कुमावत, शिवछत्रपती चित्रकार मिलिंद विचारे, माजी प्राचार्य व चित्रकार राजेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच भुसावळ येथील सेवानिवृत्त कला शिक्षक राजेंद्र जावळेसर, चित्रकार व प्राचार्य सुनील बारी सर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मित्रपरिवार व कलाप्रेमींकडूनही अनिलराज यांच्या या यशाचे भरभरून कौतुक होत असून, त्यांच्या आगामी कलात्मक प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

No comments