adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोवंश कत्तलखान्यावर LCB ची धडक कारवाई..३ आरोपी जेरबंद..८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त..२९०० किलो गोमांस हस्तगत

 गोवंश कत्तलखान्यावर LCB ची धडक कारवाई..३ आरोपी जेरबंद..८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त..२९०० किलो गोमांस हस्तगत सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -...

 गोवंश कत्तलखान्यावर LCB ची धडक कारवाई..३ आरोपी जेरबंद..८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त..२९०० किलो गोमांस हस्तगत


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल व गोमांस विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत संगमनेर शहरातील कत्तलखान्यावर छापा टाकला.या कारवाईत ३ आरोपींना ताब्यात घेऊन ८ लाख ७० हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महादेव गुट्टे,पोलीस अंमलदार संतोष खैरे, अमृत आढाव,योगेश कर्डीले व महादेव भांड यांच्या पथकाने ही कारवाई केली.दि. ४ जानेवारी २०२६ रोजी संगमनेर शहरात गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर गल्ली नं. ०६, जमजम कॉलनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला.

छाप्यादरम्यान गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असताना ३ इसम रंगेहाथ पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे

अब्दुल समद जावेद कुरेशी (वय २७) रा. भारतनगर, संगमनेर

सकलेन जाकीर कुरेशी (वय ३०) रा. संगमनेर

रेहान अल्ताफ शेख (वय २०) रा. दिल्ली नाका, इस्लामपुरा, संगमनेर

अशी आहेत.

आरोपींकडून २९०० किलो गोमांस (किंमत ₹८,७०,०००) तसेच कुऱ्हाड, कासन व सुरी (किंमत ₹८००) असा एकूण ₹८,७०,८०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं. २३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१, ३२५, ३(५) तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे.

No comments