adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाल संस्कार विद्या मंदिर यावल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बाल संस्कार विद्या मंदिर यावल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन  भरत कोळी यावल ता.प्...

बाल संस्कार विद्या मंदिर यावल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 बाल संस्कार विद्या मंदिर यावल येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बाल संस्कार विद्या मंदिर, यावल शाळेतील माजी विद्यार्थिनी सन्मानीय डॉ. ललिता नेरकर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक श्री सुनिल माळी सर यांनी प्रतिमा पूजन केले. प्रमुख पाहुणे यांनी गणित विषयात PHD तसेच नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. इयत्ता पहिली ते सातवी च्या २५ विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांचे संस्कार आणि स्वामी विवेकानंद यांचे विचार या बद्दल आपले मत मराठी व इंग्रजी भाषेत माडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक श्री.राजेंद्र फालक सर यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्याचा परिचय श्री.अतुल पवार सर यांनी करून दिला. सूत्रसंचालन इयत्ता सहावी चे विद्यार्थी स्वराली तायडे व मोहित पाटील आणि आभार सहावीची विद्यार्थिनी अंकिता रणशिंगे यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ ललिता नेरकर यांनी आपल्या मनोगतात शाळेचे ऋण व्यक्त केले आणि शाळेच्या कामकाजाचे विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांना शाळेतील उपक्रमात सहभाग व शाळेने दिलेले संस्कार कायमस्वरूपी रुजवून ठेवण्याचे सांगितले.वकृत्व शैलीचे विशेष कौतुक केले. राजमाता जिजाऊ वेशभूषा इयत्ता १ ली तील विद्यार्थिनी नारायणी बबलू येवले ने साकारले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

No comments