राज्यस्तरीय व्यक्ती अभ्यास स्पर्धेत गणेश कोळी सातव्या क्रमांकावर विजयी मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड (संपादक -:- हेमकांत गायकवाड) SCER...
राज्यस्तरीय व्यक्ती अभ्यास स्पर्धेत गणेश कोळी सातव्या क्रमांकावर विजयी
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
SCERT द्वारे आयोजित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांची राज्यस्तरीय व्यक्ती अभ्यास स्पर्धा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर येथे नुकतीच पार पडली या स्पर्धेत निमखेडी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा चिंचखेडे बुद्रुक तालुका मुक्ताईनगर येथे कार्यरत असलेले गणेश कोळी यांनी राज्यात सातवा क्रमांक पटकावून आपल्या तालुका, जिल्हा ,नाशिक विभाग व शिक्षण क्षेत्राचा गौरव वाढवला आहे. राज्यातील आठ विभागातून 35 + शिक्षक या राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झाले होते. राज्यातून 10 शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यात गणेश कोळी यांनी (शा.व्य.स. अध्यक्ष यांनी अभ्यासात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम) या विषयावर आपले सादरीकरण केले. त्यांचे शालेय समितीचे माजी अध्यक्ष श्री प्रकाश गावंडे तथा विद्यमान शालेय स्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व टीम व गावकरी यांनी व मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी श्री वसंत मोरे साहेब सर्व केंद्रप्रमुख व BRC स्टॉप पंचायत समिती मुक्ताईनगर ,सर्व शिक्षक तथा जळगाव डायटप्राचार्य श्री.अनिल झोपे साहेब व पूर्ण स्टाफ यांनी कौतुक केले आहे.

No comments