🟡 यावल येथे जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा ‘संस्कार स्नेहसंमेलन 2025–26’ उत्साहात संपन्न 🟡 भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) याव...
🟡 यावल येथे जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलचा ‘संस्कार स्नेहसंमेलन 2025–26’ उत्साहात संपन्न 🟡
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल वतीने आयोजित संस्कार स्नेहसंमेलन 2025–26 हा कार्यक्रम दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी शाळेच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष माननीय शरदभाऊ जीवराम महाजन हे होते. प्रमुख अतिथी म्हणून यावल शाळेचे उपाध्यक्ष श्री लिलाधरशेठ चौधरी, तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझिरकर, आरतीताई शरददादा महाजन, यावलचे B.E.O. विश्वनाथ धनके साहेब, तसेच श्री उलपल चौधरी, श्री रविंद्र पाटील, श्री उल्हास चौधरी, श्री ए. बी. महाजन, श्री नितीन महाजन, श्री प्रभाकर आप्पा सोनवणे, श्री जी. जी. वाघुळदे सर, श्री शाकीर सर यांची प्रमुख उपस्थिती होती. सेमी माध्यमाच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन मॅडम, इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम, श्री प्रवीण झोपे सर, पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम व सौ. गौरी भिरूड मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, गणेश पूजन, प्रभू रामचंद्र पूजन तसेच शाळेचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्यांनी प्रास्ताविकातून शाळेची माहिती सादर केली. यावेळी तहसीलदार श्रीमती मोहनमाला नाझिरकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भविष्यात जे काही बनायचे आहे ते नक्की बना; मात्र जे काही बनाल ते प्रामाणिकपणे, न्याय देत आणि आनंदाने जीवन जगत बनले पाहिजे.” यावलचे B.E.O. विश्वनाथ धनके साहेब यांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शरदभाऊ महाजन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षणाचे ध्येय आहे.” यानंतर कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना या सामूहिक नृत्याने झाली. विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य, नारी सन्मान, शेतकरी नृत्य, देवी स्तुती, सामूहिक नृत्य, देशभक्तीपर नृत्य, नाटिका अशा विविध रंगतदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व अनेक कार्यक्रमांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा पाटील मॅडम व सौ. श्रद्धा बडगुजर मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या केले. आभार प्रदर्शन शिक्षिका सौ. प्रीती भार्गव मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्यवेक्षिका गौरी भिरूड मॅडम व राजश्री लोखंडे मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित राहिल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात, आनंदात व रंगतदार वातावरणात पार पडला.


No comments