🟡 साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप 🟡 भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पी. एम. श्री साने गुरुजी म...
🟡 साने गुरुजी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप 🟡
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पी. एम. श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे माध्यमिक विभागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. व्ही. ए. काटकर सर होते. प्रमुख मान्यवर म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. एम. के. पाटील सर, उपप्राचार्य श्री. ए. एस. इंगळे सर, पर्यवेक्षक श्री. व्ही. टी. नन्नवरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. डी. एस. फेगडे सर, श्री. पी. एन. सोनवणे सर यांच्यासह सर्व शिक्षक बंधू-भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने कु. भावना पाटील, कु. सानिया पटेल, शुभम मिस्तरी व सिद्धेश पाटील यांनी मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शिक्षक वर्गातून सौ. एस. एस. माळी मॅडम व श्री. एन. डी. नेवे सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर पर्यवेक्षक श्री. व्ही. टी. नन्नवरे सर यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. एम. के. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात श्री. व्ही. ए. काटकर सर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, परिश्रम व प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती यू. डी. पाटील मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या केले. निरोप समारंभामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा मिळाला.

No comments