adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

एस.एम.टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भव्य वार्षिक स्नेहसंमेलन व पॅन इंडिया सिनेमा थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

 एस.एम.टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भव्य वार्षिक स्नेहसंमेलन व पॅन इंडिया सिनेमा थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न  (शिरपूर प्रतिनिध...

 एस.एम.टी. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भव्य वार्षिक स्नेहसंमेलन व पॅन इंडिया सिनेमा थीमवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न 


(शिरपूर प्रतिनिधी)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एस.एम.टी. इंग्लिश मिडीयम स्कूल, होळनांथे ता.शिरपूर, जि.धुळे येथे दिनांक 20 व 21 जानेवारी 2026 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाले. दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी वार्षिक बक्षीस वितरण समारंभ, तर दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची विशेष आकर्षण ठरलेली “पॅन इंडिया सिनेमा” ही संकल्पना (Theme). या थीमनुसार विद्यार्थ्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी प्रसंग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. दादासो हेमंत पाटील यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करून करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाबरोबरच शिस्त, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन प्रा. संजय पाटील, संस्थेचे मार्गदर्शक डायरेक्टर ॲड. श्री. सुनील भोई, तसेच शाळेचे प्राचार्य श्री. डॅनी सायरस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये — KGF चित्रपटातील ‘रॉकी भाई’चा थरारक फायटिंग सीन, ‘छावा’ चित्रपटावर आधारित छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्य व नृत्य सादरीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत प्रभावीपणे साकारण्यात आला. याशिवाय, प्रांजल एल.के.जी. वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रांजलच्या आवाजावर सादर केलेला नृत्याविष्कार हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. तसेच ‘शिवतांडव’ या गीतावर आधारित सादरीकरण प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणणारे ठरले. याचबरोबर ‘भूलभुलैया’ चित्रपटातील माजुलिका या व्यक्तिरेखेचा अभिनय सादर करत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवली.

कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपली कला सादर केली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश सोनार सर व श्री. राम लोहार सर यांनी अत्यंत प्रभावी, शिस्तबद्ध व समन्वयपूर्ण पद्धतीने करून कार्यक्रमाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रा. संजय पाटील यांनी समाधान व्यक्त करत सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच मार्गदर्शक डायरेक्टर ॲड. सुनील भोई यांनी शाळेच्या सांस्कृतिक व शैक्षणिक वाटचालीचे विशेष कौतुक केले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला.

No comments