सावदा पोलीसांची तत्पर कारवाई! अल्पावधीत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत आरोपी अटकेत पोलीस अधिक्षकांनी केले सन्मानित...
सावदा पोलीसांची तत्पर कारवाई!
अल्पावधीत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस दिड लाखांचा मुद्देमाल हस्तगत आरोपी अटकेत पोलीस अधिक्षकांनी केले सन्मानित.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन डायरीत जबरी चोरी प्रकरणी दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक २८४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४) प्रमाणे दाखल करण्यात आला होता या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सावदा पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी शिताफीने योग्य त्या दिशेने तपास चक्रे फिरवून अल्पावधीत यशस्वीरीत्या तपास करीत जबरी चोरीचा गुन्हा मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेण्यात सावदा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, या जबरी चोरीतील कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसतानाही सावदा पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी योग्य माहितीच्या तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा सुगावा घेऊन तपासा द्वारे गुन्ह्याचा तपास करीत या कारवाईत अब्बास इबाबत शेख इराणी व मोहम्मद अली उर्फ पहू काला अली इराणी या दोन आरोपींना अटक करण्यात सावदा पोलीसांना यश आले. तपासा दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला सुमारे १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये २३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत हस्तगत करण्यात आली. यासोबतच मलकापूर येथून चोरीस गेलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली असून, त्यामुळे मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एक गुन्हा देखील उघडकीस आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी यांनी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशाल पाटील, पोलीस हवालदार संजीव एकनाथ चौधरी, निलेश बाविस्कर व मयूर पाटील यांचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करुन गौरव केला. सावदा पोलिसांच्या या तत्पर व प्रभावी कारवाईबद्दल नागरिकांकडून कौतुक होत असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास दृढ झाला आहे.

No comments