फैजपूर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या निकिता कोळी तर स्वीकृत नगरसेवक पवन सराफ व राहुल गुजराथी यांची निवड इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत ...
फैजपूर उपनगराध्यक्षपदी भाजपच्या निकिता कोळी तर स्वीकृत नगरसेवक पवन सराफ व राहुल गुजराथी यांची निवड
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर आज दि.12 जानेवरी रोजी सकाळी 11 वाजता नगर पालिका सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यात उपनगराध्यक्षपदी कु. निकिता प्रकाश कोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तसेच स्वीकृत नगरसेवक पदासाठी राहुल गुजराथी (भाजप) आणि पवन सराफ (अपक्ष) यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. लोकनियुक्त नगराध्यक्ष दामिनी सराफ यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी पालिका सभागृहात स्वीकृत पदासाठी डॉ. दानिश शे. निसार यांचा ही नामनिर्देशक होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा नामनिर्देशन अर्ज त्रुटी असल्याने बाद करण्यात आला.
प्रतिक्रिया:-
नगरसेवक केतन किरंगे :- यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की काँग्रेसच्या गटातील सदस्यांनी नगराध्यक्ष पतीचा म्हणजेच भाजपचा प्रस्ताव काँग्रेसने स्वीकृत नगरसेवकासाठी पाठविला आकोट-अंबरनाथ या दोन नगरपरिषदानंतर फैजपूर नगरपरिषद काँग्रेसचे नगरसेवक फुटले राज्यातली ही तिसरी नगरपालिका निघाली जिथे काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला याबद्दल काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्षांना सांगून कायदेशीर कार्यवाही त्यांच्यावर करणार आहे.
प्रतिक्रिया:-
मा.उपनगराध्यक्ष शे.कुर्बान या घटनेने आक्रमण यांनी अगोदरच ठरविलेले होते की स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाला करायचे आहे. सर्वात अगोदर काँग्रेसच्या गटावर पवन सराफ यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलेला आहे पण तिथं मी संताप व्यक्त केल्यामुळे तो प्रस्ताव सेकंड डमी तयार करण्यात आला. पवन सराफ यांचा प्रस्ताव हा काँग्रेसच्या गटावरच आहे असं थेट माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बानी यांनी तीव्र संताप व्यक्त करून आक्रोश व्यक्त केला. ते पुढे म्हणाले कि आम्ही विरोधात आहे पूर्ण पाच वर्ष विरोधात राहू चांगल्या कामासाठी गावाच्या विकासासाठी आमचा पूर्ण पाठिंबा राहील चुकीचं कोणताही काम आम्ही पालिकेत होऊ देणार नाही कोणत्याही दादागिरीला किंवा दडपशाहीला खपवून घेणार नाही असेही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.


No comments