चक्री जुगार अंमली पदार्थावर साताऱ्यात धडक कारवाया :- सातारचे एसपी तुषार दोशी साहेब आता ॲक्शन मोडवर ! संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्...
चक्री जुगार अंमली पदार्थावर साताऱ्यात धडक कारवाया :- सातारचे एसपी तुषार दोशी साहेब आता ॲक्शन मोडवर !
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध धंदेवाल्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. सर्वसामान्य जनतेच्या याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल होत्या. त्याच अनुषंगाने आता सातारा जिल्ह्यात चक्री जुगार अंमली पदार्थांवर व इतर अवैधरित्या धंद्यांवर आता धडक कारवाई करण्यासाठी सातारचे एसपी तुषार दोशी साहेब आता ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखेेकडील तीन पथकांची नियुक्ती करून त्यांनी अवैध धंद्यांवर धडक कारवाईबाबत सूचना दिल्या आहेत. या टीमने पहिल्याच दिवशी 30 ते 40 कारवाई केले आहेत. यामध्ये लाखों रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्ह्यात ड्रग्ज कोकेनचा साठा सापडल्याने जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी सुरू असल्याचे समोर आले होते. दोनच दिवसांपूर्वी सातारा तालुका पोलिसांनी ही पाली गावात जवळपास 12 लाखांच्या गांजावर कारवाई केली होती. त्यामुळे जिल्ह्यात आता अवैध धंदे चक्री जुगार अंमली पदार्थ असे धंदे जिल्ह्यात ढवळून निघाले होते. याला आता आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी कारवाईबाबत चांगलेच नियोजन केले आहे. त्यामुळे आता सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची गुन्हेगारांवर चांगलाच वचक ठेवून आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशीनी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतल्यापासून आतापर्यंत अनेक मोठमोठ्या कामगिरी उघडकीस आणण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात चुकीला माफी नाही असे म्हणण्यातही काय वावगे ठरणार नाही.

No comments