गोरगावले बु.आरोग्य केंद्रात विशेष सिकलसेल ऍनिमियाबाबत कार्यशाळा. चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक १० जानेवारी २०२६ ...
गोरगावले बु.आरोग्य केंद्रात विशेष सिकलसेल ऍनिमियाबाबत कार्यशाळा.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक १० जानेवारी २०२६ शनिवार रोजी, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्या आदेशानुसार दिनांक-१५ जानेवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपुर्ण जिल्ह्याभरात सिकलसेल ऍनिमिया या आजाराविषयी विशेष अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून गृहभेटी देऊन प्रत्येक कुटुंबातील वय ० वर्षे ते ४० वर्षे वयोगटातील लोकांची, सिकलसेल अँनिमिया आजाराची तपासणी करण्यात येणार आहे.
अभियानाच्या पार्श्वभूमीवर.. चोपडा तालुका आरोग्य अधिकारी- डॉ.गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तथा डॉ.दिनेश निळे यांच्या अध्यक्षतेखाली.. प्राथमिक आरोग्य केंद्र-गोरगावले बु. ता.चोपडा येथे सिकलसेल ऍनिमिया आजाराविषयी विशेष अभियाना पुर्वीचे नियोजन तथा सर्वेक्षण करण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सिकलसेल अँनिमिया विशेष अभियानाची सुरुवात हि सन-२००९ पासून विविध उपक्रमांतून सुरूवात झालेली असुन भारतातून सन-२०४७ पर्यंत सिकलसेल आजराला हद्दपार करायचे उद्दिष्टे आहे. तसेच सिकलसेल म्हणजे काय.? सिकलसेल आजाराचे लक्षणं काय.? सिकलसेल होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी.? सिकलसेल तपासणीसाठी कोणकोणत्या तपासण्या कराव्यात..? प्रतिबंध करणेसाठी काळजी काय घ्यावी आणि औषधोपचार काय घ्यावा.? तसेच सिकलसेल जनजागृतीसाठी सर्वेक्षण दरम्यान शासकीय योजनांची माहिती देणे आवश्यक आहे, त्यात सिकलसेल बाधित रुग्णाला रेल्वे प्रवासात ५०% सवलत मिळते, एस टी प्रवास करतांना एका मदतनीसासह ST प्रवास मोफत करू शकतो, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मासिक २५००/-रुपयांचा लाभ, गरोदरपणात महिलेला HPLC व CVC गर्भजल परीक्षण करण्याची मोफत सुविधा उपलब्ध आहे. शालांत व माध्यमिक १० वी, १२ वी बोर्डाच्या परीक्षेत एका तासमागे २० मिनिटे जास्त दिले जातात, दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड प्राप्त होते.
आदी माहिती, तालुका आरोग्य सहाय्यक-श्री.विजय देशमुख यांनी दिली, तसेच गृहभेटत सर्वेक्षण करते वेळीस B-1, B-2,B-3, B-4, तसेच C-1 हे फॉर्म कसे भरावेत..? आदी माहिती श्री.कुलकर्णी यांनी दिली. सिकलसेल आजारावर उपचार म्हणून काहीच नाही, याला फक्त प्रतिबंध हाच एक उपाय असतो, त्यासाठी, नवं दांपत्य यांनी वैवाहिक जीवनाची सुरुवात करणे आधी नवरा व बायको यांनी रक्ताची सोल्युबिल्टी टेस्ट कशी करून घ्यावी.. तसेच इलेक्ट्रोफेरीसची टेस्ट करून घ्यावी. इत्यादी विषयाबद्दल, डॉ.दिनेश निळे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत तालुका आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख यांनी कार्यशाळेत प्रशिक्षण देणेसाठी, डॉ.दिनेश निळे, डॉ. शर्वरी पाटिल, तालुका आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, सिकलसेल समन्वयक-सुहास कुलकर्णी, तालुका आशा समन्वयक-सागर शिंपी हे आवर्जून उपस्थित होते. सदरच्या प्रशिक्षणासाठी.. आरोग्य सहाय्यक-सुनील महाजन, समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ.वर्षा पाटिल, डॉ.रुपाली पाटिल, आरोग्य सहाय्यीका-ज्योती नायदे, आरोग्य सेवक-महेंद्र पाटिल, दिनेश वाघ, आशीष लोसरवार, आरोग्य सेविका-माधुरी बडगुजर, विनयश्री जाधव, कल्पना सोनवणे, शेवंता बारेला, महालॅब टेक्निशियन-अमित पावरा, औषध निर्माण अधिकारी-सुयश बोरसे, व गट प्रवर्तक-शीला साळुंके, अनिता भालेराव, तथा विशेषतः सर्व आशा स्वयंसेविका, सर्व आरोग्य कर्मचारी आदी कार्यशाळेला उपस्थित होते.



No comments