मनसे विद्यार्थी सेनेच्या कॉलेज शाखेच्या नवीन फलकाचे अनावरण चोपडा | प्रतिनिधी (संपादक :- हेमकांत गायकवाड) सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या...
मनसे विद्यार्थी सेनेच्या कॉलेज शाखेच्या नवीन फलकाचे अनावरण
चोपडा | प्रतिनिधी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होत तसेच मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कॉलेज शाखेच्या नवीन फलकाचे अनावरण आज शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल पाटील, महाविद्यालय अध्यक्ष, तसेच मनसे विद्यार्थी सेनेचे तालुका संघटक चेतन पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी, त्यांच्या हक्कासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी मनसे विद्यार्थी सेना भविष्यात अधिक जोमाने काम करेल, असा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी भावेश पवार, मयूर पाटील, हर्षल पाटील, विक्की पाटील, करण पाटील, चेतन पाटील, हर्षल महाजन यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments