adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे गोमातेच्या नावावर कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची कौमी एकता संघटनेची मागणी

  फैजपूर येथे गोमातेच्या नावावर कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची कौमी एकता संघटनेची मागणी   इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:- हेमकांत...

 फैजपूर येथे गोमातेच्या नावावर कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची कौमी एकता संघटनेची मागणी  


इदू पिंजारी फैजपुर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरात गोमातेच्या नावावर संशय घेत एका निष्पाप युवकावर अमानुष मारहाण व लूटमार केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी कौमी एकता फाउंडेशन, फैजपूर यांच्या वतीने निंभोरा पोलीस स्टेशन येथे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनानुसार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी फैजपूर येथील रहिवासी जलील साबीर (वय ३४) यांच्यावर काही व्यक्तींनी कोणतीही खातरजमा न करता मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्याकडील मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेण्यात आली. या घटनेत जलील साबीर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अहवालानुसार जखमा गंभीर स्वरूपाच्या आहेत. घटनेचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही घटना कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी असल्याचे सांगत भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमे लावून तात्काळ गुन्हा दाखल करावा, सर्व आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीएसआय ढाकणे साहेब यांच्याकडे करण्यात आली आहे.

No comments