आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे; कठोरा गावात चौकशी समितीची प्रत्यक्ष पाहणी चोपडा प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भिम आर्...
आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे; कठोरा गावात चौकशी समितीची प्रत्यक्ष पाहणी
चोपडा प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख श्री. राहुल जयकर व चोपडा तालुकाध्यक्ष श्री. मुबारक तडवी यांनी सादर केलेल्या तक्रार अर्जावर प्रशासनाकडून दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, भिम आर्मी संघटनेतर्फे 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर, उपोषणाची तारीख जवळ येताच प्रशासन हालचालीत आले आहे.
प्रशासनाने तक्रारीची दखल घेत चौकशी समिती गठित केली असून, सदर समितीने दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी चोपडा तालुक्यातील कठोरा गावात प्रत्यक्ष भेट देत पाहणी व चौकशी केली. ही पाहणी भिम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तसेच पँथर सतीशजी अडकमोल व स्थानिक ग्रामस्थांच्या साक्षीने करण्यात आली.
भिम आर्मीची प्रमुख मागणी अशी आहे की, आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांना मा. जिल्हाधिकारी यांनी घरकुलासाठी मंजूर केलेली जागा संबंधित लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करण्यात यावी. तसेच या प्रकरणात जाणीवपूर्वक दिरंगाई करणारे सरपंच, ग्रामसेवक व संबंधित ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर अपात्रतेची कठोर कारवाई करण्यात यावी.
याबाबत 25 जानेवारीपर्यंत ठोस व लेखी स्वरूपात कारवाई झाली नाही, तर भिम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने 26 जानेवारी रोजी पंचायत समिती, चोपडा येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे. हे उपोषण भिम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. गणेश भाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका युनिटमार्फत करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मागण्या पूर्ण होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, असा ठाम इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
“हम हमारा हक्क मांगते हैं, ना किसी से भीख मांगते हैं.”
आयु. राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर
(भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख)
📞 9665872391 / 8983343489

No comments