अंतुर्ली येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंतुर...
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथे दि. १६/१/२०२६. वार शुक्रवार रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
या पूजनप्रसंगी माजी सरपंच सुनील दादा पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष कृषीरत्न दिनेशभाऊ पाटील, माजी सरपंच नरेंद्र दुट्टे, विक्रांत सावकारे, डॉ. रमेश कोळी, पवन पाटील, प्रमोद पाटील, ग्रामपंचायत सदस्य मोहन बेलदार, डी. आर. महाजन, नंदू देशमुख सर, गणेश सोनार, सुरेश तेली, संदीप पाटील, निलेश तेली, चंद्रकांत मामा पाटील, सौरव सपकाळ, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. संपूर्ण कार्यक्रमात शिवभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

No comments