धरणगावकर झाले ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !.... छ. संभाजीनगर येथील क्रांती दिंडी अविस्मरणीय : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज सं...
धरणगावकर झाले ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार !....
छ. संभाजीनगर येथील क्रांती दिंडी अविस्मरणीय : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
विकास पाटील धरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगांव - छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ नाट्यमंदिर येथे ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी सत्यशोधक समाज संघाचे ४३ वे राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. या दोन दिवसाच्या अधिवेशन पाच सत्रामध्ये झाले असून महाराष्ट्रातील अनेक सत्यशोधकांनी याचा लाभ घेतला. याप्रसंगी धरणगाव येथील सत्यशोधक कार्यकर्ते लक्ष्मणराव पाटील, विधीकर्ते शिवदास महाजन, निवेदिता ताठे, वेणू पाटील, पी डी पाटील यासह धरणगांवकर हे ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार झाले.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी धरणगाव व एरंडोल तालुक्यातून कार्यकर्ता निधी, दिनदर्शिका आणि सहयोग निधी २२१०० रोख व १००० ऑनलाईन असा एकुण २३,१०० रू.जमा करून मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक विधीकर्ते साळुबा पांडव यांच्या कडे सुपूर्त केला.
याप्रसंगी मोठा माळीवाडा समाजाध्यक्ष व्ही टी माळी, लहान माळीवाडा समाजाचे उपाध्यक्ष काकासो.शिवाजी बाबुराव देशमुख, माजी मुख्याध्यापक एस डब्ल्यू पाटील,सुखदेव अण्णा महाजन, माजी सचिव गोपाल माळी, सचिव दीपक महाजन, सुधाकर महाजन, राजेंद्र महाजन, उमेश महाजन, दिलीप महाजन, धीरज महाजन, सत्यशोधक कार्यकर्ते एच डी माळी, रमेश महाजन, राजेंद्र महाजन, कैलास महाजन, मगन महाजन, टोनी महाजन, वासुदेव महाजन,नितेश महाजन, निवृत्ती महाजन,जयेश महाजन उपस्थित होते. धरणगाव शहरातून ५० कार्यकर्ते या अधिवेशनाचे साक्षीदार झाले सर्वांनी वैचारिक मेजवानी घेतली, पुस्तकांची खरेदी केली व पुढे महापुरुषांचे कार्य सुरू ठेवण्याची ऊर्जा घेऊन कर्मकांडापासून दूर राहू या व सत्यशोधक विचारांवर चालूया सर्वांनी हे व्रत हाती घेतले.

No comments