त्र्यंबकेश्वरमध्ये हायवा अपघात दोघांचा मृत्यू प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) त्र्यंबकेश्वर शहरातील भ...
त्र्यंबकेश्वरमध्ये हायवा अपघात दोघांचा मृत्यू
प्रतिनिधी - जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
त्र्यंबकेश्वर शहरातील भारत पेट्रोलियम पंपाजवळ डंपर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील युवक व युवती जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नाशिक–त्र्यंबकेश्वर महामार्गाचे काम सुरू असून रस्त्यावर पडलेले साहित्य घेऊन डंपर त्र्यंबकेश्वरच्या दिशेने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व डंपर पलटी झाला.
या अपघातात मोटरसायकलवरील शिवम राजेश उंबरहांडे (वय 22, रा. पांगरी उंबरहांडे, ता. चिरवाली, जि. बुलढाणा) व भूमिका समाधान खेडेकर (वय 21, रा. अंतरी खेडेकर, ता. चिरवाली, जि. बुलढाणा) हे दोघे डंपरखाली सापडले. त्यांना तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मयतांचे नातेवाईक सातपूर येथील रहिवासी असून घटनेनंतर रुग्णालयात शोककळा पसरली होती.
दरम्यान, गजानन महाराज संस्था ते पेट्रोल पंप या दरम्यान दुभाजक नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, तात्काळ दुभाजक बसवण्याची मागणी केली आहे.


No comments