यावल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस अन् शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण संपन्न.. भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकां...
यावल महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस अन् शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण संपन्न..
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलना दरम्यान, गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस अन् शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभाला ज्येष्ठ रंगकर्मी तथा सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख उद्घाटक म्हणून तर यावल पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा श्री अजयकुमार वाढवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.. प्रारंभी दिक्षा पंडीत,कृष्णा पाटील आणि भैरवी चौधरी या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले तर दिक्षा पंडीत या विद्यार्थ्यीनेने मराठी भावगीत व प्रा रत्नाकर कोळी यांनी शाहिरी अंदाजात पाहुण्यांचे स्वागत, अन् विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवणारे गीत सादर केले. उद्घाटनीय भाषणात प्रा राजेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सही ते ऑटोग्राफ असा उल्लेखनीय प्रवास होण्यासाठी विद्यार्थ्यांनी झपाटून अभ्यास केला पाहिजे, अन् सोबतच आपल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक, वाड्मयीन, क्रिडा अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी मा. श्री अजयकुमार वाढवे यांनी विद्यार्थ्यांना जे दिसेल ते वाचावे असे आवाहन करत आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक प्रेरणादायी आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांनी देखील दोन्ही मान्यवरांच्या विचारांवर साधक बाधक चर्चा करत वाचनाचे महत्व अधोरेखित केले. साहित्याच्या वाचनाने शुद्धलेखन कसे करावे चार चौघात कसे बोलावे वागावे हे कळते म्हणून महाविद्यालयायीन जीवनात विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास कसा होईल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे असे सांगून ए.पी.आय. मा. अजयकुमार वाढवे यांच्याकडून आजीवन विद्यार्थी म्हणून कसे जगता येईल याची प्रेरणा घेतली पाहिजे असेही सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच सांस्कृतिक,वाड्मयीन,क्रिडा तसेच राष्ट्रीय सेवायोजन उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, प्रा.संजय कदम, प्रा ईम्रान खान आणि प्रा प्रतिभा रावते यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच श्री प्रमोद जोहरे यांना आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार आणि प्रा डॉ एस आर गायकवाड यांना पी एच डी संपादन केल्याबद्दल विशेष सत्कार करुन गौरविण्यात आले. दरम्यान महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या साहित्यिक गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने सुरू केलेल्या 'व्यासंग' या वार्षिक नियतकालिकाचे देखील मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.. प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी सुत्रसंचलन प्रा. प्रतिभा रावते यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. एच. जी. भंगाळे यांनी केले.. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षकेतर कर्मचारी श्री मिलिंद बोरघडे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते..

No comments