कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे कविराज राधेशाम कंडारे यांना ‘काव्यरत्न पुरस्कार’ प्रदान विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कुसुमाग्...
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे विश्वात्मक मराठी साहित्य कट्टा या मंचाच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित त्रिवेणी साहित्य संमेलन आज उत्साहात पार पडले. या संमेलनात ज्येष्ठ कवी कविराज राधेशाम अशोक कंडारे यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल काव्यरत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवयित्री सौ. हेमलता गिते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. शामसुंदर सोन्नर महाराज यांनी भूषविले व संमेलनाध्यक्षीय भाषणातून साहित्याची सामाजिक भूमिका विशद केली. विशेष प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. जयप्रकाश जातेगांवकर, मा. रामचंद्र जंगले, मा. श्री. संपत देवगिरे व मा. श्री. स्वप्नील तोरणे उपस्थित होते. कार्यक्रमातील दीपप्रज्वलन तसेच प्रतिमा व ग्रंथपूजन मा. श्री. दिलीप साळुंके व मा. श्री. धनंजय गोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी काव्यवाचनाचा कार्यक्रमही पार पडला. विविध कवींनी आपल्या रचनांचे सादरीकरण करून संमेलनाची साहित्यिक उंची अधोरेखित केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. सौ. योगिता भागवतकर यांनी केले, तर व्यासपीठ संयोजनाची जबाबदारी मा. सौ. मिनाक्षी गवळी यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
त्रिवेणी साहित्य संमेलनास साहित्यप्रेमी, कवी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments