adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपजिल्हा रुग्णालयातील यशस्वी डायलिसिस सेंटर सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार

 उपजिल्हा रुग्णालयातील यशस्वी डायलिसिस सेंटर सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:येथ...

 उपजिल्हा रुग्णालयातील यशस्वी डायलिसिस सेंटर सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर:येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या डायलिसिस सेंटरमुळे तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून या यशस्वी सेवेसाठी त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आहे

           अन्यायग्रस्त जनतेचे व्यासपीठ या सामाजिक संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते अमोल भाऊ टप यांच्या पुढाकाराने वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उंबरकर तसेच डायलिसिस सेंटरचे तंत्रज्ञ डॉ मयूर वर्मा यांचा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उंबरकर यांनी मलकापूर तालुक्यातील ज्या रुग्णांना यापूर्वी डायलिसिससाठी बाहेरगावी जावे लागत होते, त्यांनी आता मलकापूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचा लाभ घ्यावा, असे आवाहन संपूर्ण जनतेला केले.तसेच मलकापूर येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना किंवा नागरिकांना रुग्णालयासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास समाजसेवक अमोल भाऊ टप किंवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी ॲड कृष्णा मेसरे यांनी केले.उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमुळे रुग्णांचा वेळ, पैसा व त्रास वाचत असून ही सेवा अधिक प्रभावीपणे सुरू राहावी, अशी अपेक्षा यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments