adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात २३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान-तीन जणांचे देहदान

 चोपड्यात २३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान-तीन जणांचे देहदान  चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा- यशोधन चॅरिटेबल संस्थ...

 चोपड्यात २३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान-तीन जणांचे देहदान 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा- यशोधन चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष चोपडा शहरातील दंतरोग तज्ञ डॉ राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि १ जानेवारी रोजी २३६ लोकांनी रक्तदान दिले आहे. सकाळी दहा वाजता यशोधन प्लाझा नारायण वाडी चोपडा जवळ या शिबीराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील  यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक पंकज बोरोले,भाजप तालुका अध्यक्ष कांतिलाल पाटील, उद्योजक सचिन पाटील, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा संजय पाटील, पंकज कॉलेच प्राचार्य डॉ आर आर अत्तरदे, डॉ राहुल पाटील, डॉ तृप्ती पाटील, बाजार समितीचे संचालक गोपाल पाटील व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विजय पाटील, सुनील पाटील, जुगल पाटील, जितेंद्र पाटील, पंकज पाटील, संदिप पाटील, शत्रुघ्न पाटील, नरेंद्र पाटील, दिनेश नाथबुवा, गौतम शिंदे यांनी परिश्रम घेतले.

--बारा वर्षांपासून रक्तदान शिबिरे--

 सामाजीक कार्यकर्ते डॉ राहुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या १२ वर्षांपासून हे रक्त संकलन  मित्र परिवाराकडून घेण्यात येत  असते.

या शिबिरात भाजपा तालुका अध्यक्ष कांतिलाल पाटील सर, प्रा संजय पाटील, नगरसेवक गजेंद्र जैस्वाल, प्रमोद बारेला, डॉ जे डी चव्हाण, डॉ केदार पाटील, डॉ प्रशांत पाटील, डॉ विजय पाटील, डॉ एल टी पाटील, डॉ हेमंत पाटील, डॉ अशोक पाटील, डॉ सतीश भदाणे, डॉ देवेंद्र भदाणे, आदर्श शेतकरी बी जी महाजन सर, पत्रकार प्रवीण पाटील, भरत पाटील, डॉ रिषभ पटेल, भाजपा उपाध्यक्ष दिनेश जाधव, जय पाटील, डॉ निशांत सैयद, पत्रकार चंद्रकांत पाटील, पत्रकार तुषार सूर्यवंशी, लक्ष्मण पाटील, सुत गिरणी संचालक(पत्रकार)चंद्रकांत पाटील आदींसह  लोकांनी रक्तदान केले आहे.हेल्थ इज वेल ग्रुप, वंदे मातरम ग्रुप, श्याम बाबा परिवार, पंकज महाविद्यालय, गजेंद्र जैस्वाल मित्र परिवार यांचे सहकार्य मिळाले. तर यावेळी कल्पना रामसिंग पाटील, सुमनबाई लक्ष्मण पाटील, मधुकर साहेबराव पाटील यांनी देहदान  केले आहे.

No comments