ललित कला केंद्र चोपड़ा या कला संस्थेतील चार विद्यार्थ्यांची राज्य कला प्रदर्शनासाठी निवड चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
ललित कला केंद्र चोपड़ा या कला संस्थेतील चार विद्यार्थ्यांची राज्य कला प्रदर्शनासाठी निवड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भगिनी मंडळ चोपड़ा, संचालित ललित कला केंद्र, चोपड़ा जिल्हा जळगांव या अनुदानित कला संस्थेतील विवेक पाटील (चोपडा),पार्थ महाजन (अमळनेर) कु. मोहिनी जाधव (बभळाज-शिरपुर),कु.सुरेखा पवार (नंदुरबार) या चार विद्यार्थ्यांची चित्र कलाकृतींची निवड सांगली येथे भरवण्यात येणाऱ्या ६५ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन- 2025 - 26 साठी निवड करण्यात आलेली आहे. विद्यार्थी विभागाकरीता 15 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी सहभाग नोंदवला होता. मार्गदर्शन प्रा. विनोद पाटील व प्राचार्य सुनील बारी यांनी अनमोल मार्गदर्शन केले. शैक्षणिक संस्था अध्यक्षा सौ. पूनम गुजराथी, सहसचिव श्रीमती अश्विनीताई गुजराथी, आदरणीय श्री. आशीषभाई गुजराथी, उपप्राचार्य डॉ. प्रा. आशीष गुजराथी, प्राचार्य सुनील बारी, शै.विभागाचे विभाग प्रमुख व कर्मचारी वृंदांनी कौतुक करुन विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन पर शुभेच्छा व्यक्त केल्यात.

No comments