adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खडसे महाविद्यालयाचा बॉल बॅडमिंटन पुरुष संघ उपविजेता

   खडसे महाविद्यालयाचा बॉल बॅडमिंटन पुरुष संघ उपविजेता  आंतरमहाविद्यालयीन बाॅलबॅडमिंटन स्पर्धेत श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय  मुक्ताईनगर  ...

  खडसे महाविद्यालयाचा बॉल बॅडमिंटन पुरुष संघ उपविजेता 

आंतरमहाविद्यालयीन बाॅलबॅडमिंटन स्पर्धेत श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय  मुक्ताईनगर
 चा उपविजयी पुरुष  संघ

प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा (पुरुष व महिला) संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे नुकत्याच उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या पुरुष संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले.

खडसे महाविद्यालयाच्या उपविजयी संघात जय सनान्से, मयुर यमनेरे, रितेश बोदडे, उदय बोदडे, रोहित राजपूत, सुमित तायडे, संयम गणेश, अजय तायडे, अर्जुन गायकवाड, यशवंत सुरळके व प्रवीण राठोड या खेळाडूंनी सहभाग घेतला. अंतिम सामना अत्यंत चुरशीचा ठरला असून २–१ अशा सेटने पराभव स्वीकारत संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघातील जय सनान्से, रितेश बोदडे व सुमित तायडे यांची शहादा येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी जळगाव विभागाच्या बॉल बॅडमिंटन पुरुष संघात निवड झाली आहे.

या संघास महाविद्यालयाच्या क्रीडासंचालक डॉ. प्रतिभा ढाके तसेच राष्ट्रीय खेळाडू पंकज खिरोडकर, राहुल बोदडे व कृष्णा साळुंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या यशाबद्दल मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा मा. अ‍ॅड. रोहिणीताई खडसे–खेवलकर, उपाध्यक्ष मा. नारायणदादा चौधरी, सचिव मा. डॉ. सी. एस. दादा चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी तसेच सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments