नूतन मराठा महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव...
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव : जे.डी.एम.व्ही.पी.एस. नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील होते. प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. माधुरी पाटील, प्रा. आर. बी. देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. घनश्याम पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणविषयक कार्याचा, स्त्री सक्षमीकरणासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एन.एस.एस. स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments