सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- ह...
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :आज शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल व सेमी इंग्लिश मीडियम स्कूल येथे थोर समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रम शाळेचे अध्यक्ष डॉ. श्री. प्रदीप माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
प्रथम मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर इयत्ता पहिली, दुसरी व तिसरी मधील चिमुकल्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून त्यांना मानवंदना दिली. इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर भाषणे सादर केली. यावेळी मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री सोरते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments