संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर असताना फलटणचा सुपुत्र शहीद, दक्षिण आफ्रिकेतील सुदानमध्ये विकास गावडे यांना वीरमरण! सौ. शुभांगी सरोदे-...
संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर असताना फलटणचा सुपुत्र शहीद, दक्षिण आफ्रिकेतील सुदानमध्ये विकास गावडे यांना वीरमरण!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यांतील बरड येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यांना आफ्रिकेतील दक्षिण सुदान या ठिकाणी कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. जवान गावडे यांच्या निधनाची बातमी समजताच फलटण तालुक्यांसह त्यांच्या मूळगावी बरड गावात शोककळा पसरली आहे. जवान विकास गावडे हे 22 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते त्यांनी पुणे येथे सैन्य दलात अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले सध्या ते आफ्रिकेतील दक्षिण सुदान या देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत कार्यरत होते. संयुक्त राष्ट्रांच्या शांति सेनेमध्ये कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या पश्चांत आई-वडील भाऊ पत्नी आणि दोन वर्षाची छोटी मुलगी असा परिवार आहे. त्यांचे पार्थिंव मंगळवार पर्यंत मूळगावी बरड या ठिकाणी येणार असून त्यांच्यावर जड अंतःकरणाने शासकीय मानवंदना देवुन अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.

No comments