भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधींच मृत्यू, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आला होता सुट्टीवर, सातारा जिल्हा शोक सागरात बुडाला! सौ. शुभांगी सरोदे-प...
भारतीय जवानाचा लेकीच्या जन्माआधींच मृत्यू, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आला होता सुट्टीवर, सातारा जिल्हा शोक सागरात बुडाला!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातून आरेदरे परळी खोऱ्यातून काळजाला हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद परशुराम जाधव या जवानाचे साताऱ्यात अपघाती निधन झाले आहे. हा जवान आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आला होता. पण काळाने घाला घातला विशेष खेदाची बाब म्हणजे... लेकीचा जन्म होण्याआधींच काही तासांपूर्वीचं जन्मलेल्या नवजात बालिकेला जन्म घेताच आपल्या पित्याचे अंत्यदर्शन घ्यावे लागले, हा क्षण प्रत्येकांचे काळीज चिरणारा ठरला आहे. जवान प्रमोद जाधव हे सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चांत वडील त्यांची पत्नी आणि नवजात मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर जिल्हा प्रशासन आणि लष्करी विभागाकडून शासकीय मानवंदना देवुन जड अंतःकरणाने निरोप दिला. वीर जवान प्रमोद यांना आई नसल्यामुळे ते आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आठ दिवसांसाठी सुट्टीला गावी आले होते. दरम्यान आपल्या काही कामानिमिंत्त ते वाढे फाटा येथे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला आयशर टेम्पो ने जोरदारची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे आरेदरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली आहे. प्रमोद जाधव यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांच्या पत्नीला आणि काही तासांपूर्वी जन्मलेल्या मुलाला पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, यावेळी अनेकांना अश्रूं अनावर झाले होते. यावेळी सातारा प्रशासनातील अधिकारी माजी सैनिक ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परळी खोऱ्यासह सातारा जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments