साकळी ते शेगाव पालखी पदयात्रा रवाना गेल्या वीस वर्षाची पदयात्रेची अखंड परंपरा; ठिकठिकाणी पदयात्रेचे पारंपरिक पद्धतीने स्वागत भरत कोळी य...
साकळी ते शेगाव पालखी पदयात्रा रवाना
गेल्या वीस वर्षाची पदयात्रेची अखंड परंपरा; ठिकठिकाणी पदयात्रेचे पारंपरिक पद्धतीने स्वागत
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील साकळी येथील श्री गजानन महाराज फाउंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रा दि.४ जानेवारी रोजी मोठ्या 'जय गजानन... श्री गजानन ! श्री गजानन महाराज की जय । या जयघोषात रवाना झाली. पदयात्रा साकळी, शिरसाड मार्गे यावल शहरातून भुसावळकडे मार्गस्थ झाली. यात साकळी, यावल व परिसरातील तब्बल १२५ भाविक सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा दि. ८ रोजी सकाळी साडेदहा वाजता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात पोहचेल.
साकळी येथील जोशी फार्म मधील श्री. गजानन महाराज देवस्थानातून दि. ४ रोजी सकाळी साडेसहा वाजता मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज फाउंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रा रवाना झाली. ही पदयात्रा साकळी गावात दाखल झाल्यावर मुख्य चौकात सरपंच दिपक नागो पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. गावात श्रींच्या रथावर फुलांची उधळण करुन भाविकांनी पदयात्रेचे स्वागत केले
टाळ मृदंगाच्या गजरात पदयात्रा शेगावकडे रवाना झाली. ही पदयात्रा भुसावळ येथे मुक्कामा करीता रवाना झाली. पुढे मुक्ताईनगर, वडनेर भोलजी व खामगाव येथे मुक्काम करीत दि. ८ रोजी सकाळी साडेदहा वाजता पदयात्रा शेगावी गजानन महाराज मंदिरात पोहचेल. या पदयात्रेत गजानन महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल जोशी यांचे सह सर्व पदाधिकारी असंख्य भाविकांचा सहभाग आहे. पदयात्रेमुळे गाव परिसरात भक्तीमय असे मंगलमय वातावरण निर्माण झालेले होते.पदयात्रेचे हे २१ वर्ष आहे. या पदयात्रेत भजनी मंडळी व पाच ध्वजधारी दोन अब्दागिर, माऊलींचा सुवर्ण रथ आह आहे. पदयात्रेत नित्य नियमित सकाळी पाच वाजता काकड आरती होते नंतर अकरा वाजता महाआरती संध्याकाळी पाच वाजता हरिपाठ होतो व मुक्कामावर विसावा असतो. असा नित्यक्रम असतो.

No comments