adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वा.सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 स्वा.सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी  प्रतिनिधी  रविंद्र कोळी (संपादक...

 स्वा.सै. श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी 


प्रतिनिधी  रविंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक 3 जानेवारी 2025 सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वर्डी गावाच्या सरपंच सौ. शोभाताई राजेंद्र पाटील यांनी भूषवले. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सखी सावित्री समिती सदस्या डॉ. पल्लवी अक्षय पाटील, सौ वैशाली अमरनाथ पाटील, तसेच माजी विद्यार्थिनी कीर्ती पुरुषोत्तम अग्रवाल, माता पालक सौ अश्विनी भरत धनगर , करुणा क्लब सल्लागार सौ भारती मोहन चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे सत्कार विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ. एम.आर. चव्हाण व सौ व्ही.एम.पाटील मॅडम यांनी केलेत. सावित्रीच्या वेशभूषेत आलेल्या बालिकांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण सर यांनी गुलाब पुष्प देऊन केले.

सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल खालील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वैभव समाधान धनगर, करण कोळी, पूजा शरद धनगर, पूजा दशरथ धनगर(इ.5वी), मयुरी समाधान सुतार, ललिता विठ्ठल कोळी उर्वशी प्रकाश धनगर अल्फिया अमीन पिंजारी,मयुरी सुनील धनगर,उन्नती कांतीलाल धनगर, दामिनी उत्तम खंबायत,जोया सद्दाम पिंजारी, नम्रता भरत धनगर,दिव्या सुनील पाटील,अंकिता मनोज शिंदे मानसी भाषांतर धनगर दीपिका विलास पाटील भाग्यश्री कांतीलाल पाटील,(९वी)दिव्या भरत धनगर(१० वी) यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. 

माजी विद्यार्थिनी कीर्ती अग्रवाल यांनी शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच प्रमुख अतिथी डॉ.पल्लवी पाटील  यांनी स्त्रीच्या जीवनात शिक्षणाचे महत्त्व व त्यामुळे होणारे बदल याविषयी माहिती दिली. उपशिक्षक श्री एम डी पाटील व उपशिक्षिका श्रीमती वैशाली मुरलीधर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाईंचा संघर्ष व त्यांच्या समाजकार्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. शोभाताई राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या व मुलींना उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी जान्हवी सुनील पवार व लिशा संतोष नायदे यांनी केले. फलक लेखन श्री बी.वाय.सानप यांनी केले. वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments