दुर्गामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचा स्तुत्य उपक्रम; घिर्णी येथे महिलांना रोजगारासाठी ४४ शिलाई मशीन वाटप मलकापूर प्रतिनिधी (संपाद...
दुर्गामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचा स्तुत्य उपक्रम; घिर्णी येथे महिलांना रोजगारासाठी ४४ शिलाई मशीन वाटप
मलकापूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक ३ जानेवारी रोजी घिर्णी येथे दुर्गामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, रामवाडी मलकापूर या संस्थेच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिलाई मशीन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून ३० टक्के सबसिडीवर मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागात एकूण ३५० शिलाई मशीन वाटप करण्यात येत असून, त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज घिरणी गावात ४४ शिलाई मशीन वितरण करण्यात आले.
महिलांना स्वावलंबी बनवणे, घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उपाताई वनारे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी श्री छनुसिह राजपूत यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात श्री शिवचंद्र तायडे तसेच श्री छनुसिंग राजपूत दादा यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना शिवणयंत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी वर्धा येथून रिंकू घोडेस्वार,ग्रामस्थ, महिला लाभार्थी व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी देणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून, यामुळे अनेक कुटुंबांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


No comments