संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आढावा बैठक चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथील शासकीय विश्राम गृह य...
संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आढावा बैठक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील शासकीय विश्राम गृह येथे संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती १ फ्रेबुवारी रोजी आहे त्या निमित्ताने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यावेळी बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी धरणगांव येथे भानूदास विसावे यांच्या पत्नी अंजली विसावे ह्या तिसऱ्यादा नगरसेवक पदी प्रचंड मतांनी निवडून आल्यात त्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी सेवा निवृत्त केंद्र प्रमुख उत्तम चव्हाण मंगल खजुरे सोपान मोरे रोहिदास मोरे यांनी विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विनोद खजुरे,जिल्हा संघटक प्रमुख,जितेंद्र विसावे, तालुका अध्यक्ष सोपान मोरे,सोशल मीडिया प्रमुख निलेश वाघ,जिल्हा सदस्य उत्तम चव्हाण,परेश चित्ते,दिनकर शिरसाठ रोहिदास मोरे,संतोष विसावे,सूर्यप्रकाश बाविस्कर,विकी विसावे,रोहिदास विसावे,सागर काविरे,दिनेश खजुरे,लक्ष्मण काविरे, मंगल चव्हाण,राहुल काविरे,निलेश काविरे,प्रभू अहिरे,रोहित करणकाळ,विजय पाथरे आदी कार्यकतै यावेळी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम चव्हाण यांनी केले.तर आभार सुर्यप्रकाश बाविस्कर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व चर्मकार समाज बांधवानी सहकार्य केले. चोपडा येथील शासकीय विश्राम गृह येथे संत रविदास महाराज यांच्या जयंतीच्या आठावा बैठकीच्या निमित्ताने चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे याचा सत्कार करताना अध्यक्ष सोपान मोरे रोहिदास विसावे लक्ष्मण काविरे जितेंद्र विसावे उत्तम चव्हाण परेश चित्ते संतोष विसावे सुर्यप्रकाश बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments