सुशील भोसले वाठार पोलीस ठाण्याचे नवे कारभारी, वाठार पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी ! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प...
सुशील भोसले वाठार पोलीस ठाण्याचे नवे कारभारी, वाठार पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या अधिकारी !
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्हा पोलीस दलात सध्या आता हळुवार पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या म्हणजेच... खांदेपालट सुरू होत असताना दिसून येत आहे. सोमवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशात लोणंद आणि वाठार या पोलीस ठाण्यात नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असुन. लोणंद पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे स.पो.नि. सुशील भोसले यांची वाठार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले स.पो.नि. शिवाजी जायपत्रे यांची लोणंद पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर लोणंद, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नेहमीच प्रयत्नशील राहणारे स.पो.नि. सुशील भोसले यांनी वाठार पोलीस ठाणेचा बदली झालेले स.पो.नि. अविनाश माने यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. स.पो.नि. सुशील भोसले हे कर्तव्यदक्ष,शांतप्रिय आणि तेवढेच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे वाठार पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष आणि खमक्या अधिकारी मिळाल्याचे वाठारच्या परिसरांतील सर्वसामान्य आणि जनतेतून बोलले जात आहे. त्यांनी पदभार घेताच वाठार पोलीस ठाणे हे एक शांतप्रिय पोलीस ठाणे म्हणून ओळखले जाते आणि या पोलीस ठाणेत माझी लोणंद पोलीस ठाणेतून प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला माझे प्रथम प्रधान राहील, तर नुकतेच बदली झालेले स.पो.नि. अविनाश माने यांनीही वाठार पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले होते. त्यांची सातारा जिल्हा नियंत्रण कक्षात सातारला बदली झाली आहे. त्यांनाही लवकरच जिल्ह्यात नवीन पदस्थापना मिळणार आहे.

No comments